95 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा विजय बुलडाणा जिल्हयात कॉग्रेस नंबर 1 भारतजोडो पदयात्रेला मोठे यष – जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे

Khozmaster
2 Min Read
Chikhali / Buldana
जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणुकीत कॉग्रेस पक्षाने 95 ठिकाणी विजय मिळवला असुन महाविकास आघाडीच जिल्हयात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे असुन भाजप जिल्हाध्यक्षांच्या खामगांव मतदार संघात तसेच चिखली मतदार संघात भाजपाचा दारून पराभव झाला असुन गावखेडयातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला सपषेल नाकारले आहे. या निकालावर दृष्टीक्षेप टाकला असता भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे प्राथमीक चित्र असुन या निकालावरून स्पष्ट झाले असल्याची प्रतिक्रीया बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. राहुलभाउ बोंद्रे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुका मध्ये कॉग्रेस व मित्र पक्षाने दमदार कामगिरी केली असुन गावातील लोकांनीही कॉग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विष्वास व्यक्त करत विजयावर षिक्का मोर्तब केला आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या              ‘ खोटं बोला पण रेटून बोला’ या परंपरेला साजेस काम करीत काल विजयाचे खोटे आकडे माध्यमांसमोर मांडून जनतेची दिषाभुल करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला आहे. कॉग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या विजयाची धास्ती घेवुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे धांदान्त खोटे बोलत आहे.खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतजोडो यात्रेने बुलडाणा जिल्हयातील वातावरण ढवळुन निघाले असुन या पदयात्रेला सर्वजाती धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, हे झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुक निकालावरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात कॉग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहे, जनतेने कॉग्रेस पक्षावर दाखविलेला विष्वास आम्ही सार्थ ठरवु. बुलडाणा जिल्हयात झालेल्या 277 ग्रामपंचायती पैकी 95 ग्रामपंचयतीवर कॉग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवत जिल्हयात कॉग्रेस पक्ष 1 नंबर असल्याचे दाखवून दिले असुन त्याखालोखाल दुस-या क्रमांकावर मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसला 50 जागा तर तिस-या क्रमांकावर षिंदे सेनेला 37, चौथ्या क्रमांकवर उध्दव सेनेला 30 जागा तर पाचव्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाला केवळ 18 जागा मिळाल्या आहे. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीला 5 अपक्ष 4, स्थानिक आघाडी 8 कॉग्रेस मित्र पक्ष 14, भाजप मित्र पक्ष आघाडी 16 असे संख्याबळ राहले आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालावरून जनतेने भाजपाला स्पष्टपणे नाकारले असतांना भाजपकडुन मात्र ‘‘गिरे तो भी टांग उपर’’ या नितीने बोगस आकडयांचा प्रपोगंडा करून जनतेची दिषाभुल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांनी केला आहे.
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *