घरगुती गॅस सुरक्षा काळाची गरज समर्थ कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देउलगाव राजा येथे घरगुती गॅस सुरक्षा बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये घरगुती गॅस वापरताना घ्यावयाची काळजी व होणाऱ्या नुकसानापासून कशाप्रकारे टाळता येते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आकाश रायबोले गॅस सुरक्षा तज्ञ यांनी प्रत्यक्ष गॅस सिलेंडर हाताळत असताना होणाऱ्या धोक्यापासून कसे रक्षण करावे याबद्दल उपस्थिताना माहिती दिली, यामध्ये गॅस नळी अचानक कटने, रेगुलटर लीक होणे व तत्सम कारणापासून होणारे धोके व त्यापासून करता येणारे रक्षण प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळे उपस्थिताना गॅस हाताळत असताना घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती मिळाली, याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा शुभम काकड यांनी  तर उपस्थितांचे आभार प्रा सचिन सोळंकी यांनी मानले, कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे प्रा मोहजीतसिंग राजपूत, प्रा विजय पवार, प्रा देवानंद नागरे, प्रा सचिन गोरे, प्रा किरण ठाकरे, प्रा श्वेता धांडे, प्रा ऋतुजा जाधव, अर्चना जत्ती, सुवर्णा उमाळे महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *