मुर्तीजापूर ( प्रतीनिधी )
महाराष्ट्र राज्य अपंगकर्मचारी संघटना व दिव्यांग बेरोजगार संघटना अकोलाचे वतीने संत गाडगेबाबा चौक अकोला नाका मुर्तीजापूर येथे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची पूण्यतीथी निमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक प्रा .एल.डी. सरोदे तर प्रमुख अतिथी म .रा. अपंगकर्मचारी संघटनेचे अकोला जिल्हा प्राथ . शिक्षण विभाग जिल्हाध्यक्ष दिलीप सरदार, दिव्यांग बेरोजगार संघटना अमरावती विभागाचे अध्यक्ष सुधिर कडू , संभाजी ब्रिगेडचे उज्वल ठाकरे हे होते.प्रा.सरोदे यांनी संत गाडगेबाबा यांनी स्वतः कृतीतून व किर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ठ रुढींवर प्रहार करुन समाज शिक्षण केले त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले .
दिलीप सरदार यांनी संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आदर्शवत असून समाजाने आजही त्याचा अवलंब केल्यास दिन दलीतांचे कल्याण साधेल असे विचार मांडले.कार्यक्रमात अपंग कर्मचारी संघटनेचे प्रविण फुले , अनिल सरदार , नुरखॉ . संभाजी ब्रिगेडचे हितेश ठाकरे ‘ संतोष कांबे , सुनिलं वानखडे तसेच दत्त मंदिर विस्वस्त श्रीपाद सालफळे , उमेकर भाऊ , गणेश बेले , अमोल इंगळे आदींनी अभिवादन केले.कार्यक्रमाचे संचलन राम कडू यांनी तर आभार ग .ल. पवार यांनी केले .
Users Today : 17