आ.सौ.श्वेता ताई महाले यांच्या कडे विद्याधर महाले यांच्यासारखी हॉट लाईन असल्याने त्यांच्याकडून करुन कामे करून घ्यावी

Khozmaster
11 Min Read
हवामान शास्त्र अभ्यासक पंजाबराव डख
नवनिर्वाचीत सरपंच व ग्राम पंचायत सदस्य सत्कार सोहळ्यात नव निर्वाचित 25 गावांच्या सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांची उपस्थीती
चिखली
चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या सौ श्वेता ताई महाले या कर्तव्यदक्ष आमदार तर आहेतच. सोबतच विकासाचा ध्यास घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे .चिखली विधानसभा मतदारसंघाचे भाग्य असे की त्यांचे सौ श्वेता ताई महाले यांचे पती हे उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव असल्याने त्यांना कामे करणे सोपे झालेले आहे.  त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेने विशेषतः लोकप्रतिनिधी यांनी आणि आता नवनिर्वाचित सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांनी आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या जवळ विद्याधर महाले यांच्या सारखी हॉट लाइन असल्याने त्यांच्या कडून आपापल्या गावातील विकास कामांसाठी आग्रह धरून गावांचा विकास करण्याचे काम करण्याचे आवाहन प्रसिद्ध हवामान शास्त्र अभ्यासक पंजाबराव यांनी आमदार सर शेतातील महाले यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे त्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गावांच्या विकासाची संधी मिळाल्याने संधीचे सोने करा आ.सौ.श्वेता ताई महाले
गावातील जनतेने आपणास गावाच्या विकासासाठी निवडून दिलेले आहे. गावाच्या गरजेनुसार गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवून आपण गावाच्या विकासासाठी झटत राहिले पाहिजे. आपल्या जन्म आणि कर्म भूमीचे ऋण फेडण्याची उत्तम संधी जनतेने आपणास दिलेली आहे. आपले कार्यकर्तृत्व आणि  कोणताही पक्ष, जात , धर्म असा अभिनिवेश न बाळगता आपण विकासात्मक वाटचालीतून आपल्या गावाला उत्तुंग शिखरावर नेण्याचे आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी या नव निर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना केले.त्या पुढे म्हणाल्या की,
काँग्रेसने निवडणूकीत दहशत फैलवण्याचे काम केले
झालेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत काँग्रेसने दादागिरी, गुंडा गर्दी करून दहशत माजविण्याचे काम केले. ते एवढ्यावरच थांबले नसून निवडणुकीच्या नंतर सुद्धा निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे फोटोंची बातमी लावून घेऊन अनेक सरपंच आमच्याच पक्षाचे निवडून आल्याचे देखावा देखील काँग्रेसच्या माजी आमदाराने करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी या सत्कार
सोहळ्यासाठी 28 पैकी 25 गावातील नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्य होते उपस्थित
 सोहळ्यासाठी 28 पैकी 25 गावातील नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित राहिल्याने काँगेसच्या दाव्यातील हवा काढून घेतली असून माजी आमदाराने दिलेल्या पेड बातमीत केवळ फोटो आले तर  मी घेतलेल्या सत्कार सोहळ्यात सर्व सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य स्वतः पक्ष, जात , धर्म विसरून विकासाच्या राजकारणासाठी उपस्थित राहिल्या बद्दल त्यांचे जाहीर आभार देखील त्यांनी मानले.
तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमधून भाऊ भाऊ यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होते. प्रेमाचे , रक्ताचे नाते खराब होते , गावातील राजकारण हे खुटा वरून जातीवरून,  धर्मावरून केल्या जाते , त्यासाठी एकमेकांमध्ये हेवे दावे निर्माण होऊन जवळच्या नात्यात दुरावा निर्माण होतो म्हणून माणसातील जिव्हाळ्याचे नाते टिकावे वैर भाव वाढू नये यासाठी मी ग्रामपंचायतच्या निवडणुका अविरोध करण्याचे आवाहन केले होते .
आता निवडणुका संपल्या द्वेष व वैर भाव संपला पाहिजे
आता निवडणुका संपलेल्या आहेत आता सर्वांनी मनात असलेला द्वेष , वैर भाव हा संपायला पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
उदयनगर निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचे पॅनल नव्हते पक्ष विरहित निवडणुका झालेल्या असतानाही माजी आमदाराने उदयनगरच्या निवडणुकीमध्ये विजयावर जी मुजोरी  जो उन्माद व्यक्त केला त्यामध्ये काँग्रेसची संस्कृती किती मुजोर , दादागिरी व गुंडागर्दीची आहे हे दिसून येत असुन भारतीय जनता पार्टी सद्यस्थितीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असतानाही कोणत्याही कार्यकर्त्यांनी आतापर्यंत माज  दाखवला नाही . आलेली सत्ता ही जनसेवेसाठी वापरण्याचा प्रत्येक कार्यकर्ता व नेता प्रयत्न करत असून काँग्रेसची संस्कृती मुजोर संस्कृती असल्याचा घनाघाती टोला त्यांनी हाणला .
जलजिवन मिशन मधुन होणारे काम चांगल्या प्रकारे करुन घेण्याचे  
विद्याधर महाले
निवडून आलेल्या सदस्यांपैकी महिला सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला शुद्ध नळाचे पाणी मिळण्याचा ध्यास ठेवलेला आहे .आमदार श्वेता ताई महाले यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जनजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर झालेल्या आहे. सदर योजनेतील कामे अतिशय चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी महिला तिला सदस्यांनी जातीने लक्ष जेणेकरून प्रत्येक माय बहिणीच्या डोक्यावर हंडा उतरवण्याचे कामात आपला सुद्धा खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन विद्याधर महाले यांनी यावेळी करुन ज्याप्रमाणे प्रत्येक घराला शुद्ध शुद्ध पाणी देण्याची नियोजन आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी केले त्याचप्रमाणे प्रत्येक शेताला रस्ता हे ध्येय सुद्धा त्यांनी ठेवलेले आहे .येत्या काही दिवसातच आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची वाट दुरुस्त करून देऊन  समृद्धीची नवीन पहाट त्यांच्या माध्यमातून उगवणार असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी आ सौ श्वेता ताई महाले यांचे पती तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी यावेळी केले.
आ.सौ.श्वेता ताई महाले यांनी एकट्या चिखली शहरासाठी 122 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला
डॉ प्रतापसिंह राजपूत
आमदार सौ श्वेता ताई महाले आमदार झाल्यानंतर आणि राज्यांमध्ये शिवशाही सरकार आल्यानंतर चिखली शहरासाठी आमदार सौ श्वेता ताई महाले यांचे विशेष प्रयत्नाने 122 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. येत्या काही दिवसातच चिखलीचा काया पालट झालेला आपल्याला दिसेल तसेच
माजी आमदार यांनी त्या सरपंचाची यादी प्रसिद्ध करावी
काँग्रेसचे माजी आमदार राहूल बोंद्रे यांनी 24 सरपंच निवडून आणण्याचा दावा केला आहे त्या सरपंचाच्या नावाच्या यादीसह त्यांची नावे जाहिर करण्याचे आवाहन देखील जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रतापसिंह राजपूत यांनी यावेळी केले.
पांढरदेवचे चेतन म्हस्के हे सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणुन विशेष सत्कार
पांढर देव तेथील नव निर्वाचित सरपंच हे सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणुन निवडून आलेले आहेत. त्यांचा विशेष सत्कार आ सौ श्वेता ताई महाले यांच्या हस्ते करण्यात आला.
अविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना 51 लाखाचा प्रतीकात्मक धनादेश
ग्राम पंचायत अविरोध करा 51लाखाचा मिळवा असे आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी ग्राम पंचायतच्या निवडणुकी दरम्यान आश्र्वासन दिले होते. त्यांच्या आवाहनानुसार ज्या ग्राम पंचायती अविरोध झाल्या त्यांना प्रतीकात्मक स्वरूपात 51 लाखाचा मुंगसरी, सावंगीगवळी, ढालसावंगी , गट ग्राम पंचायत करतवाडी-घान – मानमोड च्या नवनिर्वाचीत सरपंच यांना प्रतीकात्मक धनादेश देण्यात आला. अविरोध झालेल्या ग्राम पंचायतीना आमदार निधी, 2515 आणि ईतर विविध शासकिय योजनामधुन मिळणाऱ्या योजनेचा मिळणाऱ्या निधिमधुन इतर गावांच्या तुलनेत जास्त निधि तरतूद करुन अतिरिक्त 51 लक्ष रुपये निधि उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच या 51 लाखाच्या निधितुन कोणकोणती कामे प्राधान्याने घ्यायची याची यादी सुद्धा देण्याचे आवाहन करण्यात आले.
भास्करराव आढळकर यांनी काँग्रेस मधुन भाजपात जाहिर प्रवेश
या सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे पदाधिकारी भास्करराव आढळकर यांनी आ सौ श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस मधुन भाजपात जाहिर प्रवेश* घेतला त्यांचा आ सौ श्वेता ताई महाले यांनी त्यांचा सत्कार केला.
नवनिर्वाचित सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांचा भगवा फेटा बांधून व सन्मान पत्र देऊन सत्कार
चिखली विधानसभा मतदारसंघातीलचिखली आणि बुलढाणा तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीचे निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुष सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला तसेच सर्व सदस्य सरपंचांना सन्मानपत्र सुद्धा देण्यात आले.
पाटोदा सरपंच प्रदीप सोळंकी,  कव्हळा सरपंच रवी डाळिंबकर , रानअंत्री सरपंच तात्याराव लहाने,  करतवाडी सरपंच शारदाताई म्हळसणे , पेनसावंगी सरपंच सविताताई शेजोळ, भोकर सरपंच गजानन फो, , पांढरदेव सरपंच चेतन म्हस्के , भानखेड सरपंच उमाताई गायकवाड , ईरला सरपंच मोहन खंडागळे,  चिखला सरपंच डॉक्टर पराग वाघ , किन्ही सवडत,  सरपंच आकाश बांडे , पिंपरखेड सरपंच शिवदास कांबळे , डासाळा सरपंच विजय मोरखेडे , मोहदरी सरपंच बाळू राठोड , सातगाव भुसारी सरपंच वनिताताई देशमुख , बोरगाव वसू सरपंच अनिताताई माने , मुंगसरी सरपंच योगिताताई पवार , महिमल सरपंच पार्वती खंबायत कर , वरखेड सरपंच विनोद भाऊ कणखर , आंधई सरपंच हेमलता वीरशीद,  धोडप सरपंच प्रदीप भाऊ कोल्हे , कोनड खुर्द सरपंच चंद्रकला जावळे ,मनुबाई सरपंच अरुणा केदार , बेराळा सरपंच चंद्रकलाबाई सुरडकर आदी  गावाचे सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य यांनी उपस्थीती लावली होती.चिखली येथील भूमिपुत्र डॉ मनीष पाटील यांची  अवंतिका कृषी विद्यापीठ मध्य प्रदेश येथे कुल सचिव म्हणुन नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत माता, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांचा सत्कार आयोजित करण्यात आला असल्याने मंचावर उपस्थित कोणत्याही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नाही. त्यांचा सत्कार शब्द सुमनांनी करण्यात आला कारण आजचे सत्कार मूर्ती हे नव निर्वाचित सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य असल्याने मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेल्या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला.यावेळी ऍड विजय कोठारी प्रदेश कार्यकारणी सदस्य, , डॉ प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,  देविदास जाधव पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,, डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप,नरहरी गवई, प्रशांत ढोरे पाटील, मुक्तार सिंग पठाण , श्रीरंग अण्णा इंडोले ,  विकास नाना डाळींबकर , डॉ राजेंद्र वाघ , पंडित दादा देशमुख प्रशांत ढोरे , डॉ गणेशराव कोल्हे ,भारत भाऊ शेळके, सुनंदा शिनगारे, सौ व्दारका भोसले, सौ निता ताई सोळंकी , सौ अर्चना ताई खबूतरे , भास्करराव राऊत सुनील पोफळे , संतोष काळे ,प्रा  वीरेंद्र वानखेडे बळीराम काळे , शंकरराव, शंकरराव तरमले,  सौ सिंधुताई तायडे , सौ सुनीताताई भालेराव , अशोक पाटील , सलीम परवेज , सुनील पडघान , अंबादास घाडगे पाटील , आशाताई घाडगे , सौ वंदनाताई वाघ  इत्यादि मंचावर तर सूत्रसंचालन पंजाबराव धनवे यांनी केले यावेळी सरपंच, सदस्य,  पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *