नाशिक (प्रतिनिधी)-
संजय धाडवे स्थिती नाजुक असली तरी काय स्वप्ने मोठी बघण्याचा अधिकार मी नक्कीच हिरावून बसलो नाही. अनेकांचे सहकार्य लाभत असल्याने मी एक दिवस नक्कीच मराठी चित्रपट लोप- पावत चाललेली कला अग्र क्रमांक देऊन जनतेच्यासमोर निश्चितपणे पुढे आणल्याशिवाय राहणार नाही. फक्त जनतेची साथ हवी, मराठी कला विकसीत होऊन अनेक कलावंत उभारीस येतील असे दै. वतन वालाशी बोलताना उमाकांत कांबळे चित्रपट निर्माता, दिग्दर्शक यांनी व्यक्त केले.
चित्रपट निर्माता, दिग्दर्शक होण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगून बिकट परिस्थितीवर मात करीत आपली मेहनत व मनमिळावू वृत्तीने अनेकांचे सहकार्य मिळवित हदगावच्या उमाकांत कांबळे धामणगावकर या चित्रपट निर्माताने छोट्या-मोठ्या तब्बल दहा चित्रपट व तीन महिती पटाची निर्मिती करून आता मुंबईचे प्रसिद्ध सिनेअभिनेता जयराज नायक यांना सोबत घेऊन घाईतघाई लगीन घाई या सामाजिक मराठी चित्रपट निर्मितीला नुकतीच नांदेड येथे राज- श्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात केली. दिग्दर्गक रवी खिल्ल- रे, देवा मोरे यांना घेऊन हदगावचे प्रतिष्ठीत व्यापारी शिरीष मनाठकर, पो.नि. आमले, ओमप्रकाश मस्के,
सुर्यकांत बाच्छे, सोन्या-चांदीचे प्रसिद्ध व्यापारी नामदेराव वाकोडे पाटील, उपनगराध्यक्ष सुनील सोनुले, शशीकांत हिंगमिरे, सुरेश कटवीवार यांच्यासह अनेकांच्या सहकार्याने उमाकांत कांबळे यांनी संत नरहरी महाराज, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, बाल भीवा, आदर्श शिक्षक सावित्रीबाई फुले, यशोगाधा, बळीची आम आदमी, स्वच्छ घर सुखी परिवार, माझे जीव गाणे यासारख्या मराठी चित्रपटाची निर्मिती स्थानिकच्या कलाकरांना घेऊन ग्रामीण भागातच केली. आपल्या प्रत्येक चित्रपटातून समाजाला चांगला संदेश समाज प्रबोधन करत आहेत. उमाकांत कांबळे अपेक्षा आहे.यांचा जन्म वसमत तालुक्यातील धामणगाव येथे एका गरीब कुटूंबात झाला. हुतात्मा बहर्जी शाळेत त्यांचे शिक्षण पुर्ण करून पत्रकारिता केली. त्यानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीकडे वळले. सध्या हदगावी स्थायिक असलेले उमाकांत कांबळे गेल्या ९ वर्षांपासून सतत चित्रपट निर्मिती करतात. हलाखीची परिस्थिती असताना देखील जिद्द आणि मेहन- तीने व कृतत्वाने इतर युवकांना एक आदर्श ठरले आहे. भविष्यात चांगल्या चित्रपटाची निर्मिती व्हावी, हदगाव- चे नाव महाराष्ट्रात पोहचून नांदेडचा भुमिपूत्र होण्याचा बहुमान व्हावा हीच.
Users Today : 17