हवामानशास्त्र अभ्यासक पंजाबराव डख- नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित २५ गावांच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या सौ.श्वेताताई महाले या कर्तव्यदक्ष आमदार तर आहेतच. सोबतच विकासाचा ध्यास घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाचे भाग्य असे की सौ.श्वेताताई महाले यांचे पती हे उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव असल्याने त्यांना कामे करणे सोपे झालेले आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेने विशेषतः लोकप्रतिनिधी यांनी आणि आता नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार सौ.श्वेता ताई महाले यांच्याजवळ विद्याधर महाले यांच्यासारखी हॉट लाइन असल्याने त्यांच्याकडून आपापल्या गावातील विकास कामांसाठी आग्रह धरून गावांचा विकास करण्याचे काम करण्याचे आवाहन प्रसिद्ध हवामान शास्त्र अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले. ते आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
Users Today : 17