शेतकऱ्यांना रब्बी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

Khozmaster
2 Min Read
एस.जी.वाघ तालुका कृषी अधिकारी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपुत
 तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी शेतकऱ्यांना रब्बी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून दुय्यम तसेच कडधान्य,तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन वाढण्यासाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, तालुका ‌कृषी अधिका-याबरोबर  जिल्हा  कृषी अधिक्षक बाळासाहेब तौर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये या आधी केले आहे.
पीक स्पर्धेसाठी सोयगांव तालुक्यात गहू, हरभरा अशा दोन पिकाची निवड केली आहे. या पीक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास  लेखी अर्ज करणे बंधनकारक राहील. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी केले आहे.सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र पीकनिहाय ३०० रुपये प्रवेश शुल्क राहील. सोयगांव तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान १०, आदिवासी गटासाठी किमान ५ यापेक्षा कमी प्रवेश अर्ज असल्यास पीकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. पीकस्पर्धेचा निकाल तालुकास्तर, जिल्हास्तर राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने घेण्यात येईल. अशा पद्धतीने पिकस्पर्धा  तालुकास्तरीय, जिल्हा स्तरीय व राज्य स्तरीय  करण्यात आली आहे. स्पर्धेतील पीकनिहाय पहिल्या तीन पीक स्पर्धेसाठी व सर्वसाधारण व आदिवासी  गटासाठी तालुकापातळीवर पहिले ५ हजार, दुसरे ३ हजार तर तिसरे २ हजार रुपयांचे बक्षिस राहील, तर जिल्हा पातळीवर पहिले १० हजार, दुसरे ७ हजार तर तिसरे बक्षिस ५ हजार रुपये असेल. तसेच राज्य पातळीवर पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार तर तिसरे ३० हजार रुपये बक्षिस राहील. हंगामातील पिक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम 31 डिसेंबर 2022 आहे.  पिकस्पर्धेसाठी तालुक्यातील पिकाचे क्षेत्र १ हजार हेक्टर असावे व लाभार्थी शेतकऱ्यांचे पिकाचे किमान क्षेत्र  ४० आर असावे. अश्या प्रकारे रब्बी हंगामासाठी सोयगाव तालुक्यात पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रब्बी हंगाम पीकस्पर्धेसाठी ३१ डिसेंबर,२०२२ ही अंतिम तारीख आहे.पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सोयगाव कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही कृषी सहाय्यक मानसिंग भोळे व कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी सोयगाव परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *