राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शैक्षणिक धोरणाची स्वप्नपूर्ती – श्री. हेमंत काळमेघ

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी लूकमान शहानिंबा बाळापूर
पर्यंत हर्षोल्हासात साजरा होणारा भारतीय कृषी क्रांतीचे प्रणेते, वैदर्भीय मातीत शैक्षणीक प्रेरणेचे बिजारोपण करणारे कुशल तिफणकरी, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ व्या जयंती उत्सवाचे उद्घाटन श्री शिवाजी विद्यालय, निंबा येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा. हेमंतजी काळमेघ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री.सुरेशदादा खोटरे व मा.श्री. पी. टी. पाटील, माजी पोलिस निरिक्षक अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत सानंद संपन्न झाला. यावेळी श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सन्मानिय आजीव सदस्य सर्वश्री श्री. रामेश्वरराव वाकळे, श्री. बाळगंगाधरजी वैराळे, श्री. भास्करराव पाटील, श्री. पुरुषोत्तमराव दहे, श्री. भानुदासजी उंबरकर, श्री. पंजाबराव सिरसाट, श्री. प्रकाश पाटील गावंडे, श्री. सुधीर देशमुख, बाळापूरचे पत्रकार रमेशजी ठाकरे, श्री. संदीप पुंडकर, माजी प्राचार्य श्री. उद्धवराव विखे, पोलीस पाटील श्री. प्रमोदराव देशमुख, निंबा गावच्या सरपंचा सौ. ज्योतीताई सोनोने, उपसरपंचा सौ. अंजलीताई तायडे, बक्षीस समारंभाचे प्रायोजक प्रा. डॉ. मंदार देशमुख उपस्थीत होते.मान्यवरांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व स्व. श्रीधाररावजी देशमुख उपाख्य मालक यांच्या पुतळ्याला कुंकुतीलक व हारार्पण करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख अतिथी मा. सुरेशदादा खोटरे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून ग्रामीण भागातील निंब्याची एव्हढी मोठी जोपासना केलेली शाळा स्व. श्रीधररावजींनी शिक्षण संस्थेस दिली ह्या वरुन त्यांच्या निस्पृह कार्यशैलीची साक्ष पटते असे गौरवोद्गार काढले. माजी पोलिस निरिक्षक मा. श्री. पी. टी. पाटील यांनी ते या परिसरातील उरळ पो.स्टे.चे थाणेदार असतानांचे श्रीधरराव देशमुख यांच्या नि:पक्ष कार्यपध्दतीचे व औदार्यचे अनुभव कथन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. हेमंत काळमेघ यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शैक्षणिक धोरणाची स्वप्नपूर्ती करणारे आहे तसेच भाऊसाहेब उपाख्य पंजाबरावजी देशमुख यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेल्या देशसेवेची मांडणी आपल्या भाषणात करुन स्व. श्रीधरराव देशमुख यांचे स्वप्न होते की केजी टू पीजी पर्यंतचे शिक्षण निंब्याच्या शाळेतच मिळाले पाहिजे. संस्था त्यांचेही स्वप्न साकार करण्यास्तव एकेक पाऊल पुढे टाकीत आहे, असे विदित केले. संस्थेचे आजीव सभासद श्री. रामेश्वर वाकळे यानीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमांतर्गत ‘श्रीधर पर्व’ ह्या जयंती वर्षानिमित्त “कबीर नीति, श्रीधर कृती” ह्या पुस्तिकेवर आधारीत स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या निमित्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा परिक्षेत अ गटातील कु. भाग्यश्री खोंड, कु. कोमल मास्कर, कु. सारिका खाळपे, कु. भाग्यश्री तायडे, कु. साक्षी सोळंके तर ब गट मधून कु. वैष्णवी तायडे, कु. तनू वानखडे, कु. जान्हवी तायडे, कु. साक्षी तायडे, कु. पायल वानखडे यांना विजयी घोषित करणायत आले. विजेत्यांचे उपस्थीत सर्वांनी कौतूक केले.प्राचार्य दिवाकर वानखडे यांच्या देखरेखीत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाचे संचलन जेष्ठ शिक्षिका बाळसराफ, प्रास्ताविक सरप सर यांनी तर आभार प्रदर्शन तरटे सर यांनी केले. या कार्यक्रमाला श्री. बढे सर, श्री पाटील सर, श्री. सानप सर, श्री. खंडारे सर, श्री. सुळे सर, श्री. गीरी सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *