चिखली
स्थानिक अनुराधा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन हा किड्स ट्रेड फेअर या प्रात्यक्षिक (आनंद मेळावा) माध्यमातून साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विंटर कॅम्प( हिवाळी शिबिर) आयोजित करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी माननीय सपकाळ सर यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक माननीय जितु भाऊ बोंद्रे, संस्थेचे विश्वस्त माननीय सिद्धेश्वर वानरे, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नन्हई व अनुराधा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या, श्रीमती मेनका ,उप प्राचार्या सोफीया, तसेच अनुराधा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बीयाणी,डॉ. काऴे, माजी विद्यार्थी अश्विन जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण तसेच त्यांच्या शालेय अर्थशास्त्र या विषयाचे येथोचित व्यावसायिक ज्ञान हे विद्यार्थ्यांना जाहिराती पासून तर विक्री व नफा या तत्वापर्यंत उत्तम रीतीने देण्याचे प्रयोजन केले होते. या उद्घाटन प्रसंगी माननीय श्री. सपकाळ साहेबांनी विद्यार्थ्यांना बोधपर शिक्षण विषयक मार्गदर्शन केले. या निवेश- किड्स ट्रेड फेअर मध्ये सर्व पालक वृंद, शिक्षक, कर्मचारी व स्कूलचे सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. या ट्रेड फेअर मध्ये विविध असे खाद्यपदार्थांची विक्री, व काही खेळ आयोजित केले होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी या स्वादिष्ट खाद्य व्यंजनांचा मनसोक्त आस्वाद घेतला. या ट्रेड फेअर कार्यक्रमाचे आयोजन विषय शिक्षिका मोनिका बिहाणी यांनी केले होते. आनंद मेळाव्याद्वारे विद्यार्थ्यांना भरपूर अनुभव व नफा मिळाला. त्याचबरोबर क्रिसमस च्या निमित्ताने विंटर कॅम्प ( हिवाऴी शिबिर) आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, सहकार्य, शौर्य, धैर्य गुण विकसित व्हावे यासाठी हे शिबिर आयोजित केले होते. त्याचबरोबर मोबाईल तारांगण मध्ये सर्वांनी अवकाश भ्रमंती ही केली.सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी अतिशय उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सदर कॅंपचा दिनांक 25 डिसेंबरला इंडस्ट्रियल भेटी नंतर समारोप झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलच्या प्राचार्या जया नन्हई, मार्गदर्शिका सुजाता कुल्ली , सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या दोन्ही उपक्रमांना संस्थेच्या अध्यक्षा ॲडवोकेट सौ.वृषालीताई बोंद्रे यांनी शुभेच्छा दिल्या.
Users Today : 17