नंदुरबार जिल्ह्यात 9 वर्षांत तब्बल 326 बालकांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया ठरली नवसंजीवनी…

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ बालकांवर शासनाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत असून, ४ बालकांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित २१ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ९ वर्षात ३२६ बालकांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. त्यामुळे बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यातील बालकांसाठी संजीवनी ठरल.जिल्ह्यात शाळा अंगणवाडी व शाळेतील लाभार्थी तपासणीसाठी २२ पथके व आश्रमशाळेत विद्यार्थी तपासणीसाठी चार असे एकूण २६ आरोग्य तपासणी पथके कार्यान्वित आहेत. बालके उद्याची भविष्य आहेत. हे उद्याचे भविष्य आरोग्यपूर्ण, सुदृढ असावे म्हणून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २०१३-१४ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सन २०१३ पासून नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र व शासकीय, निमशासकीय शाळा तसेच आश्रमशाळांमधील बालकांची नियमित सखोल वैद्यकीय तपासणी करून किरकोळ आजारी लाभार्थ्यांना औषधोपचार आणि गंभीर आजार आढळणाऱ्या लाभार्थ्यांना मोठ्या रुग्णालयात संदर्भीत करून उपचार करून घेणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
म्हणजेच “लवकर निदान व लवकर उपचार” या माध्यमातून साध्य होत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या अधिपत्याखाली राबवण्यात येत आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे तसेच अतिरिक्त जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ.सुलोचना बागुल तसेच जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील अधिकारी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील शाळा अंगणवाडी, तसेच आश्रमशाळा तपासणीसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम परिवेक्षक मनोहर ढिवरे, तसेच जिल्हा का. सहा.करण वसावे व कार्यक्रम सांख्यिकी अन्वेषक धर्मेश भट परिश्रम घेत आहेत. २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातून जिल्ह्यातील हृदय विकाराने ग्रस्त २५ बालकांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आल.पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बालकांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये रवाना केले. बालके व त्यांच्या सोबत आई-वडील यांना घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस बालाजी हॉस्पिटल भायखळा येथे रवाना करण्यात आली.१,६१,८३६ बालकांची आरोग्य तपासणी
जिल्ह्यातील एकूण अंगणवाडीतील २,४८४ मुलांची तपासणी पूर्ण झाली. तर १,६१,८३६ बालकांची आरोग्य तपासणी सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील एप्रिल ते नोव्हेंबर २२ पर्यंत एकूण १ हजार २५३ शाळांची तपासणी करण्यात आली. त्या मधील १ लाख ३० हजार ८६६ बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.पथकांच्या माध्यमातून वर्ष २०१३ ते आजतागायत नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३२६ बालकांची हृदय शस्त्रक्रिया तसेच इतर ११०३ बालकांची इतर शस्त्रक्रिया, तसेच ९ काॅक्लियर इम्प्लांट यासारख्या शस्त्रक्रिया मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या मोठ्या शहरातील नामवंत रुग्णालयात यशस्वीरित्या मोफत करण्यात येत आहेत.
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *