आदर्श विद्यालयांमध्ये जोरावर सिंह व फतेह सिंह वीर बाल दिवस साजरा     

Khozmaster
2 Min Read
सव्वा लाख से एक लढाऊ चिडिया से मे बाज लढाऊ तभी गुरुगोविंद सिंग  कहलाऊ ही युक्ती ज्या महान विभूतीची आहे ते शिखांचे दहावे गुरू श्री गुरुगोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण भारतात प्रकाश पर्व मोठ्या प्रमाणात साजरे केले जातील. या प्रकाश पर्वाचे औचित्य साधून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी आपल्या भाषणात श्री गुरुगोविंद सिंग जी यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी धर्म रक्षणासाठी केलेल्या त्यागाचा उल्लेख करून 26 डिसेंबर 1704 रोजी इस्लाम धर्म स्वीकारण्यात नकार देणाऱ्या आणि न झुकता मृत्यूला सामोरे जाणाऱ्या 9 वर्षीय जोरावरसिंह आणि 6 वर्षीय फतेह सिंह यांच्या स्मरणार्थ यापुढे २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जाईल अशी घोषणा केली होती .भारत देशाचा इतिहास शौर्याचा ,त्यागाचा आणि बलिदानाचा आहे आणि या बलिदानावरच भारत देश आज इथं सुख समृद्धीने नांदत आहे.आदर्श विद्यालय मध्ये दिनांक 26 डिसेंबर वार सोमवार रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी आदर्श विद्यालयाचे प्राचार्य माननीय शेळके सर तसेच उपप्रचार्य माननीय प्रमोदजी ठोंबरे सर तसेच पर्यवेक्षक माननीय श्री जाधव सर माननीय श्री नालिंदे सर यांच्या उपस्थितीमध्ये वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये वर्ग पाच फ मधील नैतिक रामप्रसाद आरमाळ हा जोरावर सिंह तर कृष्णा सचिन राऊत हा फतेह सिंह रुद्र अजय खरात हा अजित सिंह तर कैलास पाटील  जूझार सिंह यांच्या वेशभूषेत आले होते.  नैतिक रामप्रसाद आरमार या विद्यार्थ्याने जोरावर सिंह व फतेह सिंह यांच्या बद्दल हिंदी मध्ये छान असे मार्गदर्शन केले .या कार्यक्रमांमध्ये आदर्श विद्यालय उपप्राचार्य माननीय प्रमोदजी ठोंबरे सर यांनी जोरावर सिंह व फतेह सिंह यांच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. लहानपणीच  जोरावर सिंह व फतेह सिंह यांनी न डगमगता आपले जीवनाची बलिदान कसे दिले यांचे मार्गदर्शन माननीय ठोंबरे सर यांनी अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितले वर्ग सहा ड मधील विद्यार्थ्यांनी सुद्धा वीर बाल दिवस यावर आधारित सुविचार, बातम्या ,सामान्य ज्ञान प्रश्न ,बोधकथा यावर आधारित परिपाठ सादर केला या कार्यक्रमांमध्ये भारुडकर सर ,खोत मॅडम ,सुधीर शेटे सर ,तसेच  कार्यक्रम प्रमुख फितवे मॅडम यांचे सहकार्य लाभले.
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *