वैजापूरात सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी गोर गरीब दीन -दुबळ्याना मोफत कार्ड वाटप

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर 
शहरातील गोर-गरीब,दीन-दुबळे,निराधार,व मागासवर्गीय नागरिकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा म्हणून
आवश्यक ई-श्रम कार्ड,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड,नवीन शिधा पत्रिका इत्यादी आवश्यक प्रमाण पत्र मोफत वाटप कार्यक्रम रविवार(ता,२५)रोजी येथील संत सेना महाराज कार्यालयात संपन्न झाला ,प्रभाग सहाचे रहिवाशी सोनू राजपूत व ई,सेवा सुविधा
केंद्राचे प्रमुख गोरख मापारी यांनी यात पुढाकार घेतला,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी व जेष्ठ नागरिक तथा साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते हे कार्ड या प्रभागातील गोर,गरीब व मागासवर्गीय नागरिकांना वाटप करण्यात आले,धोंडीराम राजपूत यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना साठी या कार्डचा लाभ होणार आहे,त्याचा योग्य वापर करून सांभाळून ठेवावे
जवळपास  चारशे च्या वर नागरिकांना हे सर्व कार्ड मोफत तयार करुन देण्यात आले, या प्रभागाचे सोनू राजपूत व गोरख मापारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला, या कामात त्यांना फरहान शेख
राहुल त्रिभुवन, सागर त्रिभुवन, अमोल राजपूत,सुरेश आंबेकर,किरण दाढे, करणं शिंदे यांनी सहकार्य केले,नगरसेवक गणेश खैरे,रघुनाथ जाधव ज्ञानेश्वर सिरसाट यांची उपस्थिती होती,शेवटी सोनू राजपूत यांनी आभार मानले,(फोटो कॅप्शन-धोंडीरामसिंह राजपूत महिलांना मोफत ई,श्रम कार्ड,ईतर कार्ड प्रदान करताना,शेजारी गोरख मापारी व सोनू राजपूत,)
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *