सोयगाव_कृषी विभागामार्फत मका,पिकावरील अळी नियंत्रण विषयी मार्गदर्शन व बिजप्रकिया

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
 तालुक्यात मागील  दोन वर्षात मका पिकावर लष्करी अळीचा तसेच हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप अंतर्गत हॉटस्पॉट व्हिलेज  दि.२७/१२/२२ रोजी किन्ही, पळाशी, नांदगाव येथे तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मका, हरभरा बियाण्यावरील बीजप्रक्रिया केल्याने होणारे फायदे, मका, हरभरा पिकाच्या वाढ अवस्थेनुसार खत व्यवस्थापन ,पाणी व्यवस्थापन , कीड व रोग व्यवस्थापन तसेच अळीचा प्रादुर्भाव झाल्यास इमामेक्टीन 8 ते 10 ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करावी अशी माहिती कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख,कृषि सहाय्यक किन्ही जयश्री वाघ व कृषी सहाय्यक पळाशी राधिका सोळूखे  यांनी दिली तसेच शेतकऱ्यांना मका, हरभरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.आणि शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करणेसाठी जैविक संघ कृषी विभाामार्फत वाटप केले.सदरील प्रात्यक्षिक कार्यक्रमास गावाचे सरपंच ,उपसरपंच तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *