पिंपळखुटा प्रतिनिधी
तुलंगा बु तालुका पातूर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्याचा जिल्ह्यातील पहिला मेळावा घेण्यात आला व पातूर तालुक्यातील नागरिकांनी ,युवकांनी,महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली पातूर तालुक्यात प्रणव तायडे पाटील यांचा दांडगा जनसंपर्क व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण व लोकांच्या सुख दुखत नेहमी धावून जाणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे युवा नेतृत्व म्हणून ओळख आहे व त्यांचे वडील व त्यांच्या आई सुध्दा जिल्हा परिषद सदस्य होते त्यामुळे त्यांना आधीपासूनच समाजकारणाची लोकांची कामे करण्याची आवड आहे येत्या काळात तालुक्यात पक्ष्याला चांगले दिवस येतील व पक्ष संघटन मजबूत होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी केला .राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्या 15 दिवसापूर्वी प्रवेश करणारे प्रणव तायडे पाटील यांनी भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा घेतला या मेळाव्यामध्ये पातूर तालुक्यातील शेकडो युवकांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला व नवनिर्वाचित सरपंच व सदशयांचा सत्कार घेण्यात आला व त्या मेळाव्यासाठी प्रमुख प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपनेते मा.आ.गोपिकीशनजी बाजोरिया साहेब ,विधान परिषद आ. विप्लोवजी बाजोरिया ,मा.जि.प.सदस्य बाळासाहेब तायडे,संदीपदादा पाटील जिल्हाप्रमुख विट्ठलभाऊ सरप,निवासी जिल्हाप्रख योगेशभाऊ बुंदले, उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ चव्हाण,युवासेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मानकर ,शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख राजेश भोर ,तुलंगा बु चे मा.सरपंच देवराव हातोळे,दिपीप परनाटे ,बाळापूर तालुका सचिव श्याम बहुरूपे ,तालुका प्रमुख अमर लखाडे,पातूर शहर प्रमुख पावन तायडे,अतुल एलने ,व जिल्हातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते तुलंगा बु येथील सर्व गावकरी व तरुण मंडळी ,सरपंच व सदस्य व पातूर तालुक्यातील युवक व जेष्ठ मंडळी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळात पातूर तालुक्यात प्रणव पाटील तायडे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्याची मोठी ताकत निर्माण होईल असा विश्वास बाजोरिया साहेब यांनी बोलताना व्यक्त केला.
Users Today : 19