शिर्डीचे मा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते शाहिद इक्बाल  यांना राज्यस्तरीय युवरत्न पुरस्कार प्रदान

Khozmaster
4 Min Read
मा.ह.भ.प एकनाथ महाराज भिवंडीकर मुंबई यांची होती प्रमुख उपस्थिती
अहमदनगर येथे होणार मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा थाटात संपन्न
बार्शीटाकळी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ मानकर्तृत्वांचा सन्मान नेतृत्वांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2022 सोमवार दिनांक 25 डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर येथे मान्यवरांची उपस्थितीत संपन्न झाला असून या कार्यक्रमांमध्ये मा ह भ प एकनाथ महाराज भिवंडीकर मुंबई शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे युवा पुढारी घनश्याम दरवडे महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनाचे आदर्श नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यादवराव पावसे पाटील सुजता कासर दत्तात्रय पाटील दीपक कुमार भट महाकलाकार गुजरात राज्य रवींद्र पवार एस के थोटे आदी मान्यवरांचे हस्ते खालिद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्था चे उप आध्येक्ष डॉ शाहिद इकबाल खान सरफराज खान यांना राज्यस्तरीय युव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला शाहिद इकबाल यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना यांच्या वतीने  सन 2022 च राज्यस्तरीय युव रत्न पुरस्कार देण्यात आले तसेच सदर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यातील शंभर आदर्श सरपंचांना मान्यवरांचे हस्ते मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा आदर्श सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून स्वतःला जनकल्याणासाठी झोकुन घेणारे महान केंद्रातील माजी केंद्र प्रमुख व आदर्श शिक्षक व खालीद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्थाचे उप आध्येक्ष डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांनी आपल्या शासकीय सेवाच्या अल्पकाळात शासकीय जन कल्याण योजना व विविध लोककल्याणकारी उपक्रमा च्या माध्यमातून अनेक शासकीय योजना ची माहिती जण सामन्या पर्यंत पोहचून विविध शासकीय योजनांची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करून प्रत्यक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वये ठेवून सहकार्याची भावना ठेवत प्रत्यक कार्यात पुढे राहून उत्कृष्ट भूमिका बजावितात विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते नेहमी नावीन्यपूर्ण उपकर्म राबवितात सीड बॉल च्या माध्यमातून वृक्षरोपण या नावीन्यपूर्ण संकल्पना मुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे अकोला जिल्हा पोलीस दल मार्फत त्यांनी संपूर्ण अकोले जिल्ह्यात एक पोलीस एक वृक्ष मोहीम राबविली असून त्यांना सदर कार्याबद्दल अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे कोरोना काळात सुद्धा संपूर्ण जगात हाहाकार मजला होता अशा स्थितीमध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रातील पवित्र कार्य सोबत विविध माध्यमातून नागरिकांना कोरोना पासून बचावत्मक उपाययोजना राबविले स्वाखर्चातून सॅनिटायझर मशीन ची निर्मिती मास्कचे वितरण स्वच्छता व साथ रोग टाळण्यासाठी जनजागृती विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण, इत्यादी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली तसेच कोरोना काळातील त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून अकोला जिल्हा प्रशासना कडून त्यांची लसीकरण अभियानाचे जिल्हा ब्रँड अँबेसिडर पदी नियुक्ती करण्यात आली होती यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशभरातील विविध शासकीय व निम शासकीय संस्थांकडून त्यांना गौरविण्यात आले आहे. वृक्षरोपण स्वच्छता अभियान  प्लस पोलिओ अभियान गवर रोबिला अभियान मतदान जनजागृती अभियान जल बचाओ अभियान इत्यादी क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे त्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे ते सदर पुरस्कार श्रय आपले मोठे बंधू गुलाब नबी आझाद महाविद्यालया चे उर्दू विभाग प्रमुख डॉ प्रा बिस्मिल्लाह खान अकोला जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉक्टर वैशालीताई ठग  बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार तहसीलदार गजानन हमन्द महिला व  बालविकास प्रकल्प अधिकारी अर्पणा उगले शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख केंद्रप्रमुख पिंपळकर मुख्याध्यापक शफीक अहमद खान मुख्याध्यापक राहुल्लाह खान यांना देत आहे,
0 9 3 7 6 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *