अकोला पातूर रोडवर दुचाकीला अपघात दोन जण गंभीर,108 च्या ढिसाळपणामुळे उपचारास विलंब

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

पातूर 
अकोला-पातूर रोडवर अपघातांची मालिका थांबता थांबेना, गत काही महिन्यांपासून सदर रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून रहदारीस कमालीचा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यावर पडून असलेल्या मुरुमाच्या ढिगांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असले तरीही रस्ता बनविणाऱ्या कंपनीला नागरिकांच्या जीविताचे काही देणंघेणं नाही तसेच आरोग्य विभागाच्या 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचारी व डॉक्टरांना देखील केवळ मानधन लाटण्याव्यतिरिक्त आपल्या कर्तव्याशी जणूकाही फारकत घेतल्याचे भासत आहे.अकोला-पातूर रोडवर अकोल्याकडून पातूरकडे येत असलेल्या एका दुचाकीस पातूर सब स्टेशनच्या नजिक रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यावर आदळल्याने दुचाकीला अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.या अपघातामध्ये पातूर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी रवींद्र लक्ष्मण घायवट (वय 48) व बाळू जगराम चव्हाण (वय 44) हे दोघे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत ये-जा करणाऱ्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी सदर घटनेची माहिती 108 या रुग्णवाहिका हेल्पलाईन ला कळविले असता पातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका इतर रुग्णास घेऊन अकोला येथे गेली असल्याने सदर कॉल आलेगाव येथे रेफर करण्यात आला असता पातूर ते आलेगांव हे 22 किमी अंतर असून आलेगाव येथील रुग्णवाहिकेच्या डॉ.फुरकान यांनी पातूरला येण्यास दीड तास लागणार असून आपण आमची वाट नं पाहता दुसऱ्या एखाद्या वाहनाने जखमींना घेऊन जा असे सांगत तब्बल 35 मिनिटांपर्यंत फोनवर बोलण्यात टाईमपास केला.आलेगाव 108 च्या रुग्णवाहिकेला पातूर येथे पोहचायला केवळ वीस मिनिटं लागतात मात्र रुग्णवाहिकेच्या डॉक्टर व पायलट च्या हलगर्जीपणामुळे आज अपघाती झालेल्या दोन जखमींच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता, दरम्यान अकोल्याकडून पातूरकडे आपल्या खाजगी वाहनाने येत असलेल्या सचिन छगन लठाड या युवकाने आपले वाहन थांबवून सदर जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणून माणुसकीचा परिचय दिला.दरम्यान घडलेल्या प्रसंगी आलेगाव 108 रुग्णवाहिकेला अपघात झाल्याची माहिती सायंकाळी 6:34 ला दिली असता डॉ.मो.फुरकानोद्दीन याने जवळपास 35 मिनिटं रुग्णवाहिका येण्यास वेळ लागेल या चर्चेतच वेळ व्यतीत केल्यामुळे जखमींवर प्राथमिक उपचारासाठी वेळ लागला.जेवढ्या वेळात आलेगांव रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी बोलण्यात गमावला त्याच्या अर्ध्या वेळेत सदर रुग्णवाहिका ही पातूरला पोहचून जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे घेऊन गेली असती.केवळ 108 डॉक्टरांच्या हेकेखोरपणामुळे रुग्णांच्या उपचारासाठी विलंब होत असून प्रसंगी गंभीर असलेल्या रुग्णास आपल्या प्राणास मुकावे लागते याला सर्वस्वी जबाबदार आजच्या घटनेत ढिसाळपणा दाखवणारे डॉक्टर व सदर रुग्णवाहिकेचे चालकच असतात अशा तीव्र प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *