आ.सौ.श्वेता ताई महाले यांच्या प्रयत्नाने चिखलीत विकासाची घोडदौड सतिश गुप्त

Khozmaster
2 Min Read
चिखली
कधी नव्हे ते चिखली शहरात जिकडे तिकडे तिकडे विविध लोकोपयोगी आणि कामे सुरु आहेत. रस्ते, नाल्या या मूलभूत सुविधा सोबतच त्या त्या ठिकाणच्या गरजा आणि मागणी प्रमाणे कामे सुरू आहेत. विकास कामांसाठी लागणारा कोट्यावधी रुपयांचा निधी आ सौ श्वेता ताई महाले पाटील खेचून आणत आहे. सोबतच होत असणारी कामे अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट व्हावी व कामे दिर्घकाळ टिकावी यासाठी स्वतः आ सौ श्वेता महाले आग्रही असल्याने यंत्रणेकडून काम चांगले व्हावे यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने चिखली शहरात आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने विकासाची घोडदौड सुरू झाली असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश गुप्त यांनी चिखली शहरातली प्रभाग क्रमांक 8 मधील रस्ता कामाच्या लोकार्पण करतांना केले.श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरातली प्रभाग क्रमांक 8 मध्ये छत्रपती संभाजी महाराज कमान ते गोपाल महाराज यांच्या दुकानापर्यंत 1 कोटी 52 लक्ष रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहीद दीपक मनोहर देशमाने मार्ग नामकरण
प्रभाग क्रमांक 8 मध्ये तयार करण्यात आलेल्या या रस्त्याला चीखलीचे सुपुत्र शहीद दीपक मनोहर देशमाने असे नामकरण करण्यात आले.
शहीद दीपक मनोहर देशमाने यांचे योगदान चिखली वासी विसरणार नाही
शहीद दीपक मनोहर देशमाने हे चिखलीचे सुपुत्र होतें. त्यांनी देशासाठी बलिदान दिलेले आहे. त्यांचे हे बलिदान चिखली नगर वासी कधीच विसरू शकणार नाहीत. आज या मार्गाला शहीद दीपक मनोहर देशमाने नामकरण करून त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्वरुपी तेवत राहील असे प्रतिपादन यावेळी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी केले.या सोहळ्याचे आयोजन मा. सौ. विमलताई देव्हडे, माजी नगराध्यक्ष मा. रामदासभाऊ देव्हडे, गोविंदजी देव्हडे यांनी केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँक व चिखली अर्बन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त होते, तर प्रमुख अतिथी विद्याधरजी महाले खाजगी सचिव  उपमुख्यमंत्री, पंडितकाका देशमुख शहराध्यक्ष, डॉ. प्रतापसिंग राजपुत, प्रकाश महाराज जवंजाळ, सुरेंद्र पांडे, सुहास शेटे, कृष्णकुमार सपकाळ, शेख अनिस भाई, अंकुशराव पाटील, सौ. सुनिताताई भालेराव, प्रा. वीरेंद्र वानखेडे, शिवराजजी पाटील, सुभाषअप्पा झगडे, सुदर्शन खरात, सागर पुरोहित, सलीम परवेज, युवराज भुसारी, सुलाबाई शेळके माजी सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *