चोरी गेलेल्या टू -व्हीलर गाड्यांचा साठा सापडला विहिरीत…

Khozmaster
1 Min Read
शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
शेगाव  गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या टू व्हीलर गाड्या जिल्ह्यातून चोरीला जात होत्या.पोलिसांच्या समोर चोरांनी अहवान उभे केले परंतु पोलीस अनेक दिवसांपासून टू व्हीलर चोरणाऱ्या टोळीच्या मार्गावर होते यामध्ये खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल कोळी यांच्या पथकाने अखेर टू व्हीलर चोरांच्या मुस्क्या अडवत चोरी झालेल्या गाड्यांचा तपास लावून अखेर आरोपींना जेरबंद केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेगाव पोलीस स्टेशन  हद्दीतील वरवट शेगाव रोड वरील गौरव धाबा जवळील गणोरकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये मोटरसायकल सापडल्या… सदर चोरांनी या गाड्यांच्या नंबर प्लेट काढून गाड्या विहिरीत टाकून देत असत   घटनास्थळी दहा गाड्या विहिरीतून काढताना पोलिसांना यश आले .. गाड्या काढण्याचे काम अद्यापही पोलिसांच्या कडून होत आहे.जिल्ह्यातील मोटार गाड्या चोरणाऱ्या  रॅकेटचे उघड  केल्यामुळे उपविभागीय अधिकारी श्री अमोल कोळी व त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *