समर्थच्या कृषी दूत व कृषी कन्यांनी दिली राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2022 ला भेट

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील कृषिदूत व कृषी कन्यांनी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव दिनांक 27 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान करण्यात आलेला आहे. या ॲग्रोटेक 2022 प्रदर्शनास कृषीदूत व कृषी कन्यांनी भेट दिली, या भेटी दरम्यान चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनात कमी खर्चाचे शाश्वत तंत्रज्ञान, विविध कडधान्ये व त्याचा जाती, आधुनिक शेती करीता यंत्र व अवजारे, गावपातळीवरच कृषी प्रक्रिया उदयोगाच्या योजना, कृषी पूरक व्यवसाय रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या नवीन संधी याचा प्रत्यक्ष पाहणीतून अनुभव घेत आपल्या कृषी ज्ञानामध्ये भर घालत या आपल्या ज्ञानाचा उपयोग नक्कीच शेतकरी हितासाठी करू अशी अपेक्षा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीला भेट दिलेल्या कृषिदूत व कृषी कन्यांनी व्यक्त केली. या भेटीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात प्रा शुभम काकड, प्रा मोहजीतसिंग राजपूत, प्रा अरविंद देशमाने, प्रा देवानंद नागरे, प्रा मंगेश धांडे, प्रा सचिन गोरे, प्रा सोनाली इंगळे व विद्यार्थी यांनी यशस्वी केली.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *