प्रो. डॉ. दिलीप अर्जुने
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद : शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण प्राथमिकतेने करण्यासंदर्भात मान्य करण्यात
आलेल्या प्रस्तावांमध्ये आवश्यक पदभरती, तात्पुरत्या स्वरूपाच्या तासिका तत्व, कंत्राटी, तदर्थ इत्यादी नियुत्तäया पूर्णपणे बंद कराव्या. सातव्या वेतन आयोगाची देशभरात एक समान अंमलबजावणी करावी. आणि १ जानेवारी २००४ पूर्वी अस्तित्वात असलेली जुनी पेन्शन योजना सर्वांसाठी अंमलात आणावी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला.
या मागणीसाठी शैक्षिक महासंघाने राज्यव्यापी स्वाक्षरी अभियान राबवण्याचा संकल्कप केला तरी या संदर्भात शासनाने सकारात्मक पाऊले
उचलावीr अन्यथा शैक्षिक महासंघ संलग्नित राज्यभरातील विविध संघटना आंदोलन उभारणी करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सर्व कर्मचार्यांना एकसारखी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या मागणीसाठी दि.२६/१२/२२ रोजी प्रो. डॉ. सतिष देशपांडे (सहसंचालक,
उच्च शिक्षण विभाग, औरंगाबाद) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रोफेसर डॉ . दिलीप अर्जुने, प्रोफेसर डॉ. सत्यप्रेम घुमरे, डॉ. संदीप जगताप, डॉ. प्रशांत नेतनकर, डॉ. भरत सलामपुरे, गोविंद कदम, डॉ. भगवान डोके, डॉ. महानंदा दळवी, डॉ. निलेश देगांवकर आदींनी निवेदनावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
Users Today : 20