आखिर सुधाकर इंगोले यांच्या मर्डर प्रकरणात हायकोर्टाने राजीव लहानेची जामीन नाकारल्यामुळे इंगोलो कुटुंबातील सदस्यांनी हायकोर्टाचे आभार मानले

Khozmaster
2 Min Read

सतीश मवाळ बुलढाणा

येथील सुधाकर इंगोले यांना 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जुन्या वादातून मारहाण करण्यात आली होती त्याचा उपचार दरम्यान औरंगाबाद हॉस्पिटल येथे 2 ऑक्टोंबर रोजी मृत्यू झाला होता या प्रकरणातील आरोपी राजू लहाने यांचा जामीन अर्ज नागपूर हायकोर्टाने फेटाळला आहे. गजानन रामदास इंगोले राहणार देऊळगाव माळी यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दाखल केली होती त्याचे चुलत भाऊ सुधाकर इंगोले यांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी सात वाजता धाड नाक्याजवळ अजिंठा रोड बुलढाणा येथे बोलावून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना राजू लहाने राहणार सुंदर खेड याने व त्याच्या साथीदाराने जीवन मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर जाड वस्तीने प्रहार करून गंभीर जखमी केले होते सुधाकर इंगोले यांना अपेक्स हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारार्थ भरती केल्या असताना त्यांचा २ ऑक्टोंबर रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला याबाबत 30 सप्टेंबर रोजी गजानन इंगोले यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन बुलढाणा येथे राजीव लहाने यांच्यावर भादविच्या कलम 302 360 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान राजू लहाने याने जमानत मिळण्यासाठी प्रथम जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे अर्ज केला असता त्यांचा अर्ज नामंजूर केला त्यानंतर राजु लहाने नागपूर येथे हायकोर्टात जमानत अर्ज दाखल केला असता गजानन इंगोले यांनी  सरकारी वकिलांना मदत म्हणून एडवोकेट आशुतोष वानखेडे यांना वकीलपत्र दिले त्याचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नागपूर हायकोर्टाने राजू लहाने यांची जमानत नाकारली आहे राजू लहाने यांच्या वतीने एडवोकेट काळ वाघे यांनी कामकाज पाहिले.

0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *