संघटन आणि आर्थिक स्थैर्यानेच समाजाचा खरा विकास….आमदार किरणराव सरनाईक

Khozmaster
4 Min Read

देशमुख वधू-वर परिचय व स्नेहमिलन मेळाव्यात १८०० घ्या उपस्थितीचा उच्चांक

प्रतिनिधी लूकमान शहा निंबा बाळापूर

अकोला
 देशमुख समाजाने मतभेदांना बाजूला सर्वांगीण विकासाच्या ध्येयसिध्दीसाठी डॉ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुखांच्या विचार आणि कर्तृत्वाच्या प्रेरणांसून संघटीत झालं पाहिजे.तरच निकोप संघटन आर्थिक स्थैर्याचे वैभवाचे दिवस समाजाला दिसू शकतील. त्यासाठी एकत्र येणे महत्वाचे असून आजच्या मेळाव्यात जमलेला गर्दीचा उच्चांक पाहून मी खऱ्या अर्थाने भारावून गेलो आहे.असे भावनिक उद्गार शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.किरणराव सरनाईक यांनी अकोला येथे बोलतांना केले.अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळ, देशमुख महिला मंडळ आणि देशमुख समाज जागृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वधू – वर परिचय व समाजबांधव मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.जानोरकर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि बाहेरून निवडक वधू वरांसह आलेल्या १८०० समाजबांधवांची उपस्थिती म्हणजे आतापर्यंतच्या मेळाव्यातील हजेरीचा हा उच्चांक ठरला होता.
याप्रसंगी सर्वप्रथम दिपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज,समाजभूषण डॉ.पंजाबराव देशमुख व संत भैय्यूजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून वंदन करण्यात आले.या सोहळ्यास अभिनेत्री प्रतिक्षा देशमुख हिच्या हजेरीसह उद्घाटक म्हणून बाळापूरचे कर्तव्यदक्ष आमदार श्री.नितीनबाप्पू देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून सातारा येथील‌ समाजसेविका स्व.डॅडी देशमुख यांच्या कन्या निलिमा भोसले,निर्माण ग्रूपचे संस्थापक- अध्यक्ष श्री.गणेशराव देशमुख नाशिक येथील प्रख्यात युवा उद्योजक श्री राहूल बाप्पू देशमुख तर व्यासपीठावर अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाचे अध्यक्ष श्री संजय देशमुख निंबेकर, देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.राजश्रीताई देशमुख,व जागृती मंडळाचे अध्यक्ष श्री संजय देशमुख कंझारेकर, उपस्थित होते.यावेळी मेळाव्याचे उद्घाटन करून वधू- वर मार्गदर्शक पुस्तिका “शुभमंगलम्” व वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.शुभमंगलम् च्या खरेदीसाठी गर्दी होऊन अभूतपूर्व विक्री यावेळी झाली. प्रसंगी अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.के.एम.बाप्पू देशमुख,श्रीमती कवितताई वसंतराव देशमुख व‌ ईतरांचा सत्कार करण्यात आला.
सौ‌.नयनाताई देशमुख,श्वेता देशमुख यांच्या सुत्रसंचालनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबध्दल अभिनेत्री प्रतिक्षा देशमुख सह गायक आशिष देशमुख,गझलकार नितीन देशमुख,विश्वजीत देशमुख,उद्योजक‌ राहूल देशमुख वायुसेना दलातील उत्कर्ष देशमुख,भाविका देशमुख,निशांत देशमुख, व ईतर दोन अशा
या ८ जणांना समाजभूषण पुरस्कांनी सन्मानित करण्यात आले.व्दितीय सत्रामध्ये वधू -वर परिचयपत्रांचे आणि आलेल्या परिचयाचे वाचन करण्यात आले.समाजाला पुढे नेणे ही फक्त मंडळाची जबाबदारी नसून ते समाज बांधवांचेही कर्तव्य आहे.कार्यक्रम पार पाडणे हे काम दिव्य असून म्हणून समाजाने आर्थिक सहकार्याने पुढे आले पाहिजे, असे वाहन श्री गणेशराव देशमुख यांनी तर निलीमाताई भोसले यांनी सामाजिक अडचणींमधील वास्तवता ओळखून वाटचाल झाली पाहिजे अशा अपेक्षा मनोगतातून व्यक्त केल्या.समाजसेवा मंडळ श्री.अध्यक्ष संजय देशमुख,निंबेकर व महिला मंडळ अध्यक्षा सौ.राजश्रीताई देशमुख यांनी मंडळांची वाटचाल विषद करून समाजातून विधायक सहकार्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या तर प्रा.संजय देशमुख यांनी यांनी सामाजिक वाटचालीतील अडचणी स्पष्ट करून योग्य संघटनासाठी अतिथींकडून सहकार्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देशमुख समाजसेवा मंडळाचे सर्वश्री संजय देशमुख,अध्यक्ष उपाध्यक्ष के.व्ही.देशमुख,सचिव अश्विन देशमुख,यशवंत देशमुख,वसंतराव देशमुख,राजाभाऊ देशमुख,रिधोरेकर,व्ही.डब्ल्यू. देशमुख,हरिष देशमुख,राजाभाऊ देशमुख,कवठळकर,अंकूश तवर तर जागृती युवा मंडळाचे संजय कृष्णराव देशमुख,
प्रा.संजय देशमुख, नितिन देशमुख, विजय देशमुख, सुजय देशमुख, अनिल देशमुख योगेश देशमुख,मुकेश देशमुख, संदिप देशमुख,
डी.आर.देशमुख, डॉ अतुल देशमुख,
शेखर देशमुख,तुषार देशमुख, शरद देशमुख, कुलदीप देशमुख, दत्तात्रय देशमुख अनिल सरनाईक, प्रविण देशमुख, मयुर देशमुख, अभिषेक देशमुख, अमोल देशमुख,तर देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.राजश्री देशमुख,सौ.कल्पना प्रदिप देशमुख,कविताताई ढोरे,उपाध्यक्षा सौ.नयना देशमुख, सचिव सौ.स्वप्नाली देशमुख,कोषाध्यक्षा प्रतिभाताई देशमुख,सौ.संध्या देशमुख,डॉ.छायाताई देशमुख,कविताताताई देशमुख,खंडाळेकर,जेष्ठ सदस्या सौ.लताताई,संध्याताई,पुष्पाताई,ज्योतीताई, विजयाताई,व मंडळ पदाधिकारी आणि सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला सुनिता ताई देशमुख,सोनालीताई देशमुख( अमरावती),छायाताई ( अमरावती)छायाताई देशमुख,माधूरी देशमुख,( शेगाव) प्रभाताई,अंजलीताई ( चिखली) अंजली ताई ( खामगाव)साधनाताई,पुष्पाताई,किरणताई,विजयाताई,अंजू देशमुख,मनिषा,स्वप्ना,प्रिती,रोहिणी,वैशाली,अलका,शीतल,विशाखा,अश्विनी,दिप्ती,श्रध्दा,अनुराधाममता आणि प्रतिष्ठीत बहूसंख्य महिला उपस्थित होत्या.
पदाधिकाऱ्यांच्या धडपडीला न्याय देण्यासाठी समाजातील बहूसंख्य युवा आणि संवेदनशील आदरणीय समाजसेवी व्यक्तींनी कर्तव्य भावनेतून सर्वार्थाने विशेष सहकार्य दिले.त्या सर्व hu समाजबांधवांचे आणि उपस्थितांचे तथा जानोरकर मंगल कार्यालय संचालक आणि व्यवस्थापनाचे तिनही मंडळांकडून सौ.नयनाताई देशमुख आभार व्यक्त केले.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *