बुलडाणा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 28 ते दि. 29 डिसेंबर 2022 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित विभागस्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुले-मुली खेळाडूच्या किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक तुपकर, दिवानसिंग मानसिंग जाधव, ॲड. दिपकदादा पाटील, अरविंद अंबुसकर, अनिल अंबुसकर उपस्थित होते. श्री. गायकवाड यांनी क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन होण्यासाठी, तसेच युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी स्पर्धा उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय अंबुसकर, रोशनी अंबुसकर, प्रविण राऊत, गायत्री दिग्रसकर, कृष्णा कथडे, रणजित कथडे हे पंचाधिकारी आहेत. स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, वरिष्ठ लिपिक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे यांनी पुढाकार घेतला.
लम्पी चर्म रोगाचे पशूधनाचे नुकसान झाल्यास
पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत
बुलडाणा, दि. 28 : लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशूधनास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पशूपालकांनी पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.लम्पी चर्म रोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधन नुकसान भरपाई देण्यासंबंधी ऑनलाईन प्रणालीनुसार mhpashuaarogya.com या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ॲप पशूसहायता PASHUSAHAYATA वर नोंदणी करुन नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यात यावेत. पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:च्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्यामुळे अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. ऑनलाईन अर्ज तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, विस्तार, पंचायत समिती यांच्याकडून कार्यक्षेत्रातील संबंधित पशूधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, यांना युजर आयडी पासवर्ड निर्धारित करुन फॉरवर्ड करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशूसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले यांनी केले आहे.
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
बुलडाणा
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा लोकशाही दिन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.लोकशाही दिनात जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतील. या महिन्यातील लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेद्वारे घेण्यात येणार आहे. लोकशाही दिनी तक्रारदाराला स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारदारानी तक्रार रजिस्टर पोस्टाने प्रभारी अधिकारी, लोकशही दिन, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या नावे पाठवावे.अर्जदाराने अर्ज करताना अर्ज विहित नमुन्यातील असावा, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, विहित अर्ज नमून्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवावेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करावा.लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व व अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती जोडल्या नसल्यास असे अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.
Users Today : 29