पांढऱ्या सोन्याचा भाव पडला; खर्चही निघेना, शेतकरी अडचणीत

Khozmaster
3 Min Read
कापसाला ७ ते ७५०० हजार रुपये भाव
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरात यंदा कपाशीचा पेरा जास्तीच होता कारण मागच्या वर्षी कापशाला भाव बारा ते तेरा हजार रुपये पर्यंत होता आणि यंदा सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादन कमालीची घट झाली आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दरही घसरू लागले आहेत. कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून ८ ते ९ हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे. उत्पन्न खर्चही मिळणे मुश्कील झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.कापसाचा हंगाम आता संपत आलाय, मात्र भाव काही वाढण्याचे नाव घेत नाही. कापसाला किमान साडेबारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या केवळ सात ते साडेसात हजार रुपये एवढा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला ब्रेक लावला आहे. गेल्यावर्षी १२ हजार रुपयांवर पोहोचलेला.कापसाचा भाव यावर्षी सुरुवातीपासूनच ९ हजारांच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे. कापसाच्या भावात मंदी असल्याचे चित्र जिल्ह्याच्या बाजारपेठेत दिसून येत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे असतानाही कापसाचा भाव मात्र गेल्या महिनाभरापासून ८ ते ९ हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे अशे चित्र सोयगाव तालुक्यात दिसून येत आहे.kपांढऱ्या सोन्याचा भाव पडला; खर्चही निघेना, शेतकरी अडचणीत
कापसाला ७ ते ७५०० हजार रुपये भाव
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरात यंदा कपाशीचा पेरा जास्तीच होता कारण मागच्या वर्षी कापशाला भाव बारा ते तेरा हजार रुपये पर्यंत होता आणि यंदा सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादन कमालीची घट झाली आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दरही घसरू लागले आहेत. कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून ८ ते ९ हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे. उत्पन्न खर्चही मिळणे मुश्कील झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.कापसाचा हंगाम आता संपत आलाय, मात्र भाव काही वाढण्याचे नाव घेत नाही. कापसाला किमान साडेबारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या केवळ सात ते साडेसात हजार रुपये एवढा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला ब्रेक लावला आहे. गेल्यावर्षी १२ हजार रुपयांवर पोहोचलेला.कापसाचा भाव यावर्षी सुरुवातीपासूनच ९ हजारांच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे. कापसाच्या भावात मंदी असल्याचे चित्र जिल्ह्याच्या बाजारपेठेत दिसून येत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे असतानाही कापसाचा भाव मात्र गेल्या महिनाभरापासून ८ ते ९ हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे अशे चित्र सोयगाव तालुक्यात दिसून येत आहे.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *