तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
देऊळगाव राजा
तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील संत देविदास महाराज सभागृहात बैसोनि पाण्यावरी वाचली न्यानेश्वरी संतश्रेष्ठ प पु भगवान बाबा यांच्या ७जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन केले आहे.गेल्या २०वर्षा पासून दर वर्षी कोणताही खंड न पडू देता मुखदगत ह भ प रामराव महाराज डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत असून याही वर्षी ज्ञान दानाचे काम करणार आहे या अखंड हरिनाम आणि भागवत कथा चे वाचन भागवत कथाकार ह भ प एकनाथ महाराज जोशी खल्याळ गव्हाणकर ,हे करणार आहे.३१डिसेंबर पासून ६ जानेवारी पर्यन्त अनुक्रमे ह भ प प्रकाश महाराज वाघ पांगरी ,ह भ प निकम गुरुजी देऊळगाव राजा,हभप ज्ञानेश्वरमहाराज झगरे वाकद ,ह भ प रमेश महाराज जायभाये सावखेड नागरे ,हभप संतोष महाराज डोईफोडे जागदरी, हभप दामू अण्णा शिंगणे महाराज शेंदुर्जन ,हभप गणेश महाराज कोल्हे रामनगर,, यांचे कीर्तन होणार असून ७जानेवारी रोजी सांगता होणार असून काल्याचे कीर्तन हभप ग्यानेश्वरमहाराज तायडे कलाना यांचे होणार आहे तदनंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल तर रोजनिशी काकडा,रमेश ढाकणे हरिपाठ रामभाऊ महाराज डोईफोडे, गायनाचार्य पांडुरंग गुरुजी, नामदेव वाघ पांगरी विजय महाराज डोईफोडे अनिल डोईफोडे भानुदास बंगाळे सिनगाव कर मृन्दूगाचार्य जनार्दन महाराज नागरे गारगुंडी अशा या भरगच्च कार्यक्रमाने सिनगाव नगरी भक्तीसागरात तल्लीन होणार आहे कार्यक्रमाच्या यशस्विते साठी शेषराव जी गुरुजी संस्थाध्यक्ष शंकरराव डोईफोडे विठोबा जायभाये सुधाकर डोईफोडे, सुरेश अण्णा डोईफोडे, गजानन मुंडे आयोजक समस्त गावकरी तसेच सजावट साठी विशाल डेकोरेशन करणार आहे.
Users Today : 20