नेत्यांचे भाषण म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सपनोकी बिर्याणी असते तर शेतकऱ्यांना बळीराज्याचे स्वप्न दाखवणे नेत्यांचा धंदा झाला आहे.त्रासलेले शेतकरी शेतकरी जेंव्हा नेत्याच्या बगल भाषणाचे बळी पडतात तेंव्हा पश्चाताप होतो तर काही होरपळलेला तरुण आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करतात.सोशल मीडियावर जोरदार पणे वायरल होत असलेला एक व्हिडिओ खूप काही सांगून जातो.
सविस्तर असे की माजी वस्त्र उद्योग राज्यमंत्री पद भूषविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते यांनी कापसाला ज्या वेळी दहा ते अकरा हजार प्रती क्विंटल पर्यंत भाव असतांना नोव्हेंबर महिन्यात एल्गार मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या कापसाला १२७०० रुपये प्रति क्विंटल तर सोयाबिन ला ८३०० भाव मिळवून देण्याचे आश्वासन देत एल्गार मोर्चा काढला, रविकांत तुपकर यांच्या आव्हानाला भरभरून प्रतिसाद देत हजारो शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चात भाग घेतला व रविकांत तुपकर यांच्यावर विश्वास ठेवून कापूस सोयाबिन बाजारात न विकता घरातच ठेवली.परंतु आता शेतकऱ्यांना पश्चाताप होत असल्याचे दिसुन येत आहे. डिसेंबर महिन्यात कापसाला चांगला दहा ते अकरा हजार भाव होता तो आज गडगडला असुन त्याच कापसाचा भाव आता ७४९० रुपये प्रति क्विंटल व सोयाबिन ५३०० प्रति क्विंटल झाल्याने.
एल्गार मोर्चा काढून मोठ मोठी आश्वासन देऊन आपली फसवणूक झाल्याचा रोष या व्हिडिओत दिसुन येत आहे.
Users Today : 20