मोखाडा राजेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये परसबागाची लागवड करून मुलांना स्वादिष्ट पोषण आहार देण्याचा प्रयत्न

Khozmaster
2 Min Read
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यातील अतीदुर्गंमभागातील विविध उपक्रमात अग्रेसर असणारी जिल्हा परिषद शाळा राजेवाडी,केंद्र-वाकडपाडा,ता.मोखाडा,जि.पालघर येथे या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री.रविंद्र पांडुरंग विशे सर यांनी आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवत असतात. यामध्ये परसबाग मोठ्या प्रमाण तयार करुन एक आदर्श घडविलेला आहे. ए एस के फाऊंडेशनयांच्या विशेष सहकार्याने शाळेत मोठ्या प्रमाणात गांडुळ खत तयार केले आहे. व या खतापासून शाळेसाठी परसबाग तयार करुन यामध्ये वांगी, टाॅमेटो, घेवडा, स्ट्रॉबेरी, भेंडी या खतापासून तयार करुन सदर भाजीपाला शालेय पोषण आहारात त्याचा वापर केला जात आहे.त्यामुळे स्वदिष्ठ पोषण मिळत असल्याने मुलांची उपस्थिती १००% झाली आहे.मुलांनी तयार केलेले गांडुळ खत आज शाळेतील मुलांनी श्री.दत्ता ठोमरे (शिक्षक मिञ) यांच्या मार्गदर्शनाने पाॅकिटे भरुन,वजन करुन विक्रीसाठी २०० किलो पाॅकिटे तयार केली आहेत या खतविक्रीतुन मिळणार नफा विद्याद्यार्थ्यांना साहित्य व पुन्हा नवीन मोठ्या प्रमाणात गांडुळ खत तयार करण्यात येणार आहे . असे शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री.बाळकृष्ण ञ्यंबक पाटील व श्री.भगवान शेळके यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी मोखाडा तालुक्याचे उपसभापती मा.श्री. प्रदिपजी वाघ साहेब , मा.सौ.कुसूम झोले मॅडम (जि.प.सदस्या) मा.श्री.नंदकुमार वाघ (उपसरपंच वाकडपाडा) मा.श्री. जंगले साहेब, (गटशिक्षणाधिकारी ) मा.श्री.रामचंद्र विशे साहेब (विस्तार अधिकारी ) मा. श्री.नंदु वाघ साहेब (विस्तार अधिकारी) वाकडपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सखाराम रेरे सर व सुर्यमाळ केंद्रांचे केंद्रप्रमुख घनशाम कांबळे साहेब यांनी भेट देऊन शाळेला शुभेच्छा दिल्या.तसेच परिसरातील सर्व शिक्षक वर्गाकडुन शाळेचे व शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *