नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार सिनेस्टार अशोक शिंदे यांना जाहीर

Khozmaster
2 Min Read
आत्मसम्मान संस्थेसह तुळशीदास खिरोडकार, उमेश अलोने, श्रीकांत पिंजरकर यांचाही होणार सन्मान
रितेश कुमार  टीलावत प्रतिनिधी तेल्हारा
अकोला- सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन अकोला यांच्या वतीने नटश्रेष्ठ निळू फुले स्मृति पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा पुरस्कार मुंबईचे सिनेस्टार अशोक शिंदे यांना जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीत मराठीचे देवानंद म्हणून ओळखले जाणारे शिंदे यांचे तब्बल २२५ चित्रपट, १५० सिरियल्स आणि ५० पेक्षा जास्त नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली आहे.पुरस्कार वितरण सोहळा ८ जानेवारी २०२३ ला शेतकरी सदन सभागृह , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे होत आहे. दिवस रात्र मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या बोदवड जि. जळगाव खान्देश येथील आत्मसम्मान फाउंडेशनला नटश्रेष्ठ निळू फुले समाजभूषण पुरस्कार, अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोळकार यांना नटश्रेष्ठ निळू फुले समाज गौरव पुरस्कार, एबीपी माझाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोने यांना नटश्रेष्ठ निळू फुले युवा भूषण पुरस्कार, शिवर येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पिंजरकर यांना नटश्रेष्ठ निळू फुले समाजवैभव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पुरस्कार वितरण सोहळ्याला ओरिसा विद्युत बोर्डचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुरहरी केळे, लायन्स क्लब वर्धाचे संचालक अनिल नरेडी, लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, नांदुऱ्याचे तहसीलदार राहुल तायडे, वर्धा कला महोत्सवाचे अध्यक्ष संदीप चिचाटे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पुरस्कर्त्यांची निवड पुण्याचे डाॅ. बाबा आढाव, हेमलकसाचे पद्मश्री डाॅ. प्रकाश आमटे, पुण्याचे मुस्लिम सत्यशाेधकचे माजी अध्यक्ष मकबुल तांबाेळी, मुंबई राष्ट्रीय सेवादलाचे तात्या बाेराटे आदी समितीतील सदस्यांनी केली आहे. सन २०१० पासून ही संस्था अखंडपणे उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांना पुरस्कृत करीत आहे. साेबतच नाट्य, सिने दिग्दर्शन कार्यशाळा यांचेही दरवर्षी आयाेजन करीत आहे. आजपर्यंत १२५ मान्यवर विभुतींना पुरस्कृत करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने समाजसेवी डाॅ. मंदाकिनी आमटे, सिने अभिनेत्री साेनाली कुलकर्णी, अभिनेता मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे, सिनेस्टार राजेश चिटणीस, तुंबडी गायक, नकलाकार वसंतदादा मानवटकर, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे.तरी या सोहळ्याला रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमेश थोरात, उपाध्यक्ष ॲड. नितीन धूत, सचिव सुधाकर गीते, आजीव सदस्य प्रशांत फुलारी, विजय मोहरीर, श्रीमती ज्योती भिडे, स्वागताध्यक्ष प्रा. सागर चौथे यांनी केले आहे.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *