करणी सेनेचे अजय सेंगर यांना तात्काळ अटक करा :-भाई विजयकांत गवई

Khozmaster
1 Min Read
महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी 
प्रति.चिखली
चिखली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले करणी सेनेचे अजय सेंगर यांनी भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ बुलडोझरने पाडून टाका असे निवेदन उपमुख्यमंत्री यांना दिले. त्या सेंगरचे आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी येतात महाराष्ट्र सरकारने त्वरित अजय सेंगर यांना अटक करा महाराष्ट्र मध्ये जातीय हिंदू बौद्ध मध्ये दंगली घडवण्याचं काम हा हरामखोर करत आहे महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखो अनुयायी यांचे काळजी घेण्याचे काम करणे गरजेचे आहे बिन डोक्याचे माणसं ज्यांना इतिहास माहीत नाही उचलली जीभ लागला भुकायला महाराष्ट्रामध्ये सरकार आले तेव्हापासून महापुरुषांचा अपमान, महिलांचा अपमान करतात आणि माफी मागून दिलगिरी व्यक्त करतात या हारामखोर यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने करावा अन्यथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी केलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलीमभाई, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, चिखली शहर अध्यक्ष सुनील सोळंके, चिखली तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, चिखली शहर उपाध्यक्ष रमेश अंभोरे, शाखा अध्यक्ष सौरभ बावस्कर, अनिल चव्हाण, यश बावस्कर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *