रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रिय प्रशासकीय अधिकारी राजाराम मोरे…. 

Khozmaster
3 Min Read
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )
राजाराम अनंत मोरे हे समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे प्रशासन अधिकारी तथा प्रभारी समाज कल्याण निरीक्षक ह्या पदावर गेले दोन वर्षापासून काम करत आहेत. त्यांचे कडे काही दिवसापूर्वीच दलीत वस्ती सुधार योजना व आंतर जातीय विवाह योजना अश्या दोन योजना त्यांच्या कामाचा अनुभव व आवाका लक्षात घेता देण्यांत आलें आहे. तसेच त्यांच्याकडे तांडा वस्ती सुधार योजना ही आहे. त्यांनी सदर योजनेचे उत्तम प्रकारे कामकाज केले आहे.रायगड जिल्हा परिषद कार्यालयातील एक कार्यतत्पर व कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून राजाराम मोरे हे नाव जनमानसात प्रसिद्ध आहे. ते कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय, सौजन्यशील असे उत्तम व्यक्तीमत्व असून ते स्वतः मागासवर्गीय घटकातील असून अभ्यासू वृत्तीचे आहेत. ते आपली शासकीय नोकरी सांभाळून संपूर्ण महाराष्ट्र भर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या न्याय समता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्ववादी लोककल्याणकारी विचारांचा प्रचार आणि प्रसार स्वतः पदर मोड करून बहुजन समाजास आणि मागास समाजाला देत आहेत.त्यांच्या या महान कार्याची दखल घेत त्यांना जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेकविध सामाजिक संस्था आणि संघटना यांनी अनेक राज्य स्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांना कोणत्याही वेळी, कोणतीही माहिती विचारा, मग ती अगदी मोबाईल वरून जरी विचारली तरी ते सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ व योग्य ती माहिती देतात. ते आपल्या कार्यालयात आलेल्या नागरिकांना किंवा फोन वरून बोलणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना मी आता कामात कामात आहे. मला नंतर कॉल करा. नंतर या वगैरे असे त्यांनी अद्यापि म्हटलेले कोणाच्याही ऐकिवात नाही. त्यांना त्यांच्याकडे असलेल्या कामाविषयी किंवा त्यांच्याकडे असलेल्या कार्याभारा संबंधितच नाही तर एकूणच जिल्हा परिषद वा इतर कार्यालया बाहेरील माहिती विचारा ती माहिती त्यांच्याकडून तात्काळ व योग्य प्रकारे पुरवली जाते. यात शंका नाही.त्याच्या स्वभावानुसार ते अगदी मनमोकळे असून त्यांनी आजवर कोणतीही माहिती कोणालाही देण्यास कधीही नकार वा विरोध केलेला नाही.
त्यांच्या कार्यालयात आलेल्या सर्वच लोकांना ते सन्मानपूर्वक देऊन त्यांची विचारपूस करून त्यांना हवी असलेली मदत व अचूक माहीती देतात. त्यामुळे त्यांना सर्वच लोक धन्यवाद दिल्या शिवाय राहत नाही. त्यांच्या कार्यतत्पर कार्यपद्धतीवर जिल्ह्यातील सर्व नागरिक संतुष्ट आहेत. शासनाच्या योजना समाजातील सर्व स्तरावर अगदी तळागाळातील जनतेपर्यंत तत्परतेने पोहचवण्यास नेहमी कटीबद्ध असलेल्या राजाराम मोरे यांनी आजवर कार्य तत्परतेने कामकाज केले आहे आणि या पुढेही ते करत राहणार.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *