आमखेड सरपंचपदी विद्याताई जगन्नाथ वाघ 

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी/सिंदखेडराजा दिपक म्हस्के 
सिंदखेडराजा भारतीय सैनिक दलातुन  रिटायर झालेले मेजर जगन्नाथ वाघ यांच्या पत्नी विद्याताई वाघ यांची आमखेड ग्रामपंचायत सरपंच पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली.जगन्नाथ वाघ देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाज सेवा करण्याची इच्छा मनासी बाळगून चक्क गावकऱ्यांनी त्यांच्या हाती एक मताने ठराव मंजूर करून चिखली तालुक्यातील आमखेड गावच्या सरपंच पदाची धुरा माजी सैनिक जगन्नाथ वाघ यांच्या पत्नी विद्याताई वाघ यांना त्यांचे पती  माजी सैनिक असल्याने गावच्या विकास कामात कुठे ही भ्रष्टाचार होणार नाही असे पाहता गावकऱ्यांनी त्यांच्या हाती सत्ता दिली.गावकर्यानी मला एक मताने ठराव घेऊन अविरोध पणे मला आमखेड ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान केल्याबद्दल गावकऱ्यांच्या विश्वासाला कुठे ही तडा जाऊ देणार नसून चिखली तालुक्यातील आमखेड गाव विकासासाठी एक नंबर असेल व गाव नसुन हे तिर्थक्षेत्र असेल असंही ग्वाही सरपंच पदावर विराजमान होताच गावकऱ्यांना सांगितले  सरपंच विद्याताई वाघ यांना गावकरी शेतकरी कष्टकरी वारकरी यांनी भरभरून आशिर्वाद दिला.गावकर्यानी सत्कार करुन अभिनंदनाचा वर्षाव केला.प्रशासनाच्या वतीने निवडणूक अधिकारी श्री पाटील साहेब.जाधव साहेब.तलाठी सौ शिंगणे मँडम.ग्रांपंचायत सचिव.सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सर्व सदस्य प्रतिनिधी.गावकरी विद्याताई वाघ यांचे वडील.मोहाडी गावचे माजी सरपंच असल्यामुळे त्यांना लहान पणापासून गावातील सरपंच पदांसाचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना गावच्या विकासासाठी कोणालाही सांगण्याची आवश्यकता नसल्यामुळे गावकऱ्यांनी विद्याताई वाघ यांना सरपंच पदी विराजमान केले आहे.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *