लग्नाचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार!

Khozmaster
1 Min Read
मळसुर
मामाच्या घरी आलेली पाहुणी १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथे पळवून नेल्याची घटना २५ डिसेंबरला घडली होती. तिथे तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी चान्नी पोलिस ठाणेअंतर्गत मामाच्या घरी आली होती. आरोपी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथे पळवून घेऊन गेला. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी २५ डिसेंबरला आरोपी राज अरुण सदांशिव (वय २८) यांच्याविरुद्ध मुलीला अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात २८ डिसेंबरला उपनिरीक्षक गणेश महाजन, सुधाकर करवते, हर्षल श्रीवास, उज्वला
प्रतिक्रिया
अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अपहरण, पोस्को, अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे.
-गणेश महाजन, उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन, चान्नी
इटिवाले यांनी मुलीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी व तिच्या जबाबावरून २९ डिसेंबरला आरोपी राज अरुण सदाशिव यांच्याविरुद्ध गुन्ह्यात वाढ केली आहे. आरोपी फरार असून, पोलिस शोध घेत आहे.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *