सिन्नर प्रतिनिधी( संजय धाडवे)
शहरातील यशोधन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसमेलन पालकांच्या, प्रमुख पाहुण्यांच्या व शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून मुसळगांव पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन, लोकनामा दैनिक या वृत्तपत्रा चे पत्रकार दीपक जगताप , बिल्डर असोसियेशन चे पदाधिकारी गजानन जगताप , गांगुर्डे शोरूम चे चेअरमन दिनकर गांगुर्डे, संस्थेच्या सचिव सारिका म्याडम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून विध्येचि देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर दोडके सर यांनी मान्यवरांचा शाल, पुष्प, व मानचिन्ह देऊन उपस्थिती मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार केला.व संस्थेची ध्येय धोरण उपस्थित मान्यवरांना सांगितली. डॉ. मनोहर दोडके यांनी आपल्या भाषणात गरीब व गरजु लोकांसाठी स्कुल व कॉलेज सुरु केलेले आहेत व गरीब मुलगा शिकला पाहिजे या साठी सामाजिक उपक्रम म्हणून स्कुल चालवत असल्याचे सांगितले. तसेंच 32 निराधार मुली दत्तक घेऊन त्यांना सांभाळत असून 13 जिल्ह्यात लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले. गेली विस वर्षांपासून अहोरात्र समाजिक कार्य करत असल्याने चेन्नई येथे डॉक्टरेट मिळाली आलेला जन्म सार्थकी झाला म्हणाले.प्रमुख पाहुणे म्हणून आलेले दैनिक लोकनामा चे पत्रकार दीपक जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ.मनोहर दोडके सर यांच्या समाजिक कार्याचे कौतुक करत स्कुल च्या प्रगतीचे व विध्यार्र्थी वर्गाचे देखील उपस्थित पालकांशि संवाद साधत पत्रकारिता व समाज या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यांच्या भाषणाने सबंध पालकवर्ग व संस्थे ने त्यांचे आभार व्यक्त केले. मुसळगांव पोलीस स्टेशन चे पी एस आय त्रिभुवन यांनी कायदा व नागरिक या विषयावर प्रभोधन केले.
विध्यार्थी व पालकांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यांना प्रमुख मान्यवर दैनिक लोकनामा चे पत्रकार दीपक जगताप , पी एस आय रावसाहेब त्रिभुवन , गजानन जगताप, संस्थेच्या सचिव सारिका म्याडम , व अध्यक्ष डॉ.मनोहर दोडके सर यांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले.विध्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आपली कला सादर केली. संस्थेनी सर्वात योगदान देणाऱ्या संथेच्या कर्मचारि दीपाली तायडे यांचा पैठणी देऊन सत्कार केला.स्कुल च्या वतीने शिक्षक कोमल घेगडमल, जयश्री नाथे यांनी सूत्र संचलन केले. तसेंच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रिया पाटोळे, मनीषा गरुड,दीपाली तायडे, ललिता फड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिता ने करण्यात आली.
Users Today : 20