व्हाईस ऑफ मिडियाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली एलसीबी प्रमुखांची भेट

Khozmaster
1 Min Read
बुलडाणा 
मातृतिर्थ  अशी बुलडाणा जिल्हयाची महाराष्ट्रातचं नव्हेतर देशात ख्याती आहे. त्यामुळे जिल्हयाचा क्राईम रेट कमी करणे किंबहुना गुन्हे घडूच नयेत यासाठी स्थानिक गुन्हा शाखेकडून प्रयत्न करण्यात येतील. जिल्हयातील कायदा – सुव्यवस्था व सामाजिक एकोपा कायम ठेवण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही बुलडाणा एलसीबीचे प्रमुख अशोक लांडे यांनी दिली.एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी नववर्षाच्या पुर्वसंध्येवर एलसीबी प्रमुख पदाचा प्रभार स्विकारला. त्यावेळी त्यांचे स्वागत व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी व्हाईस ऑफ मिडियाच्या शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी झालेल्या संवादादरम्यान ते बोलत होते. यावेळी व्हाईस मिडियाचे शहर शाखा अध्यक्ष गणेश निकम, शहर कोषाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, सोहम घाडगे, सचिन लहाने, शौकत शहा, गणेश उबरहंडे व विनोद सावळे आदी उपस्थित होते. यावेळी व्हाईस ऑफ मिडियाच्या पदाधिकाऱ्यांनी व्हाईस ऑफ संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती एलसीबी प्रमुखांना दिली.त्यावर त्यांनी संघटनेच्या कार्याचे कौतूक केले.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *