बेलगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read
मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथील जुन्या वादाच्या कारणावरून निलंबित प्रयोग शाळा परिचारकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बेलगाव येथील महादजी पाटील विद्यालय येथे प्रयोगशाळा परिचय या पदावर कार्यरत असलेले (सध्या निलंबित) राजेंद्र देशमुख यांनी पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली की, गैरजदार सुरेश वानखेडे, संदीप वानखेडे, दीपक कुटे, सुशील वानखेडे ,मनीष वानखेडे यांनी घरासमोर ओट्यावर बसलेला असताना जुन्या वादाच्या कारणावरून कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना याला मारा हा कोर्टात गेला नाही पाहिजेत. असे म्हणून सुरीने हातावर पायावर मारून जखमी केले. व पत्नी सोडवण्यात आली असता पत्नीला सुद्धा मारहाण केली. व भावाला मारहाण केली.तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.राजेंद्र देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनला कलम 143,147, 148 ,149 ,323, 324 ,504, 506 294 भादवी नुसार गुन्हा दाखल केला .असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *