तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाअंतर्गत चतुर्थ वर्ष सत्र आठ च्या विद्यार्थ्यांना दुग्ध जन्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.श्री गजानन महाराज कृषि व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांचा विद्यार्थ्यांने उद्योजक बनून यशाची नवनवीन शिखरे गाठावीत असा आग्रह असतो याच संकल्पनेतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना दुग्ध प्रक्रिया उद्योग निगडित आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आपल्या कृषी महाविद्यालयात उपलब्ध करून दिल्यात त्यामुळेच कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित व्हावे आणि याचाच फायदा होऊन आयुष्यामध्ये नोकरी न मागता नोकरी देणारे व्हावे या उद्देशाने प्रा. श्वेता धांडे आणि प्रा. सचिन गोरे यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारातून सक्षम करण्याच्या दृष्टीने दूध आणि दुग्ध जन्य पदार्थांविषयी माहिती देऊन व विविध दुग्ध जन्य पदार्थांची निर्मिती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या सोबतीने करून तसेच त्या उत्पादित पदार्थांची विक्री विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करून या विक्रीतून प्राप्त उत्पन्नाचे विनीयोग करून राहिलेला नफा विद्यार्थ्यांना सह प्रमाण दाखवून स्वयंरोजगारातून समृद्धीकडे जाता येते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ मलाई पेढा, गूळ पेढा , रसमलाई, रसगुल्ला, बासुंदी असे विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण घेतले जेणेकरून पुढील आयुष्यात विद्यार्थी स्वयंरोजगाराला प्राधान्य देऊन यश प्राप्त करतील याच दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन समर्थ कृषी महाविद्यालयात करण्यात आले होते.
Users Today : 20