राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत

KHOZ MASTER
4 Min Read

 

बुलडाणा ,

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणारे अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे. केंद्र शासनाने 1 जानेवारी 2023 पासुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात येणार असून, बुलढाणा जिल्हयामध्ये अन्न धान्य वितरणाचे पुढीलप्रमाणे प्राधान्य कुटुंबा योजना गहू- दोन किलो प्रति व्यक्ती, प्राधान्य कुटुंब योजना तांदूळ तीन किलो प्रती व्यक्ती, अंत्योदय योजना गहू 18 किलो प्रती कार्ड धारकांना,तांदूळ 17 किलो प्रती कार्ड धारकास, साखर 1 किलो प्रती कार्डधारकांना साखर 20 रुपये किलो.  सर्व धान्य परिणाम गोदामातील उपलब्ध साठा व लाभार्थीं संख्येचे उपलब्धतेनुसार राहील असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

कामगार कल्याकारी मंडळाचे कामकाज ऑनलाईन होणार  

बुलडाणा , दि. 4 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळे अंतर्गत्‍ बुलढाणा जिल्हयातील कामगारांना आवाहन करण्यात येते की, कामगार नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाचे सर्व कामकाज ऑनलाईन प्रणालीव्दारे करण्यात आले आहे.असे आवाहन उप कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ तथा सरकारी कामगार अधिकारी बुलढाणा यांनी केले आहे.

खामगांव तालुक्यातील मुलींकरीता आत्मसंरक्षण करिता

स्वयंसिध्दाचे अनिवासी प्रशिक्षण शिबिर बाबत बुलडाणा

महिला व मुलींकरीता आत्मरक्षण कला अवगत व्हावी व त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचे व कुटूंबाचे रक्षण करता यावे व आत्मविश्वासाने जीवन जगता यावे या उद्देशाने खामगांव येथील तसेच खामगांव तालुक्यातील मुली व महिलांकरीता दि.10 जानेवारी 2023 पासुन ते दि.25 जानेवारी 2023 पर्यंत, तालुका क्रीडा संकुल, खामगांव येथे महिला आत्मरक्षण कला प्रशिक्षण शिबीराचे निशुल्क आयोजन करण्यात आले आहे.  खामगांव शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थीनी / महाविद्यालयीन विद्यार्थीनी तसेच महिलांचा सहभाग वाढविण्याकरीता आपल्या सहकार्याची आवश्यकता असुन, आपल्या शाळा / महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थींनीना सदर शिबीरामध्ये सहभागी होण्याकरीता प्रोत्साहीत करावे व शिबीरामध्ये सहभागी होण्यास इच्छुक विद्यार्थीनींची यादी शिबीर प्रमुख श्री.राजेश सोनले, तालुका क्रीडा संकुल, खामगांव (मो.नं.9881954211) येथे सादर करण्यात यावी. सदर शिबीर सकाळ व सायंकाळ दोन तास चालणार असुन,शिबीराला आत्मरक्षणाबाबतचे प्रशिक्षण श्री.राजेश सोनले, मानद क्रीडा मार्गदर्शक यांचेकडून निशुल्क देण्यात येणार आहे. तसेच शिबीरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या जिवित वा वित्तहानीची जबाबदारी ही सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींची राहील.  समारोप समारंभामध्ये सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीला सहभाग प्रमाणपत्र देवुन सन्मानीत करण्यात येईल असे मा.ॲड.आकाश फुंडकर, मा.आमदार तथा अध्यक्ष, तालुका क्रीडा संकुल समिती, खामगांव, मा.श्री.अतुल पाटोळे तहसिलदार, मा.श्री. अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, मा.श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा, मा.श्री.लक्ष्मीशंकर यादव तालुका क्रीडा अधिकारी खामगांव, मा.श्री.नंदकिशोर खरात गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगांव यांनी आवाहन केले आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्याप्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

बुलडाणा, इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रवेश परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. या प्रवेश परिक्षेसाठी दि. 10 जानेवारी, 2023 पर्यत अर्ज प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्याकडुन भरुन घेऊन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज शासकीय, अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत.आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, पालक, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रासोबत जोडावा. सदर परीक्षा दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी सहावीकरिता सकाळी 11 ते 13 या वेळेत आणि सातवी ते नववी करिता सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. ही परिक्षा शासकीय आश्रमशाळा, कोथळी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला, शासकीय आश्रमशाळा, घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा येथे होणार आहे असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.

 

 

0 9 7 1 5 8
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *