बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी कडुन बालिकादिन अतिउत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read
नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे)
मुलगी म्हणजेच संपूर्ण देशाचे वैभव! मात्र हीच मुलगी ‘चूल व मूल ‘या संकल्पनेत गोठलेली होती. या ओळीपूरतंच तीचं आयुष्य होतं. बालवयातच तीला चूल व मूल यांची जबाबदारी पाळावी लागायची. मात्र या काळात *एक महान विचार करणारी माय यांना लाभली ती माय म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.!* या आईने मुलींनी सुद्धा साक्षर व्हावं असा विचार केला व मुलींसाठी शाळा सुरु केली, असंख्य मुली त्यांनी घडवल्या व एक नवी क्रांती घडली.०३ जानेवारी म्हणजे या माय माऊलीचा जन्मदिन! आज २१ व्या शतकातील प्रत्येकच मुलगी ही सावित्रीची लेक म्हणून ओळखल्या जाते. म्हणूनच त्यांच्या जयंती निमित्त ‘३ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.’ काल मंगळवार दि. ०३ जाने २०२३ रोजी नांदुरा येथे बाळासाहेबांची शिवसेना माहिला आघाडी कडुन बालिका दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रला सुरुवात करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सरिताताई बावस्कार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.कुमारी हिंदवी प्रकाश बावस्कार हिने सावित्रीबाई ची भूमिका साकारून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अनिलभाऊ जांगडे,बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख यांनी मुलींचे चुकणारे पाऊल व लव्ह जिहादला बळी पडणाऱ्या मुली, मुलींच्या जीवनातील पालकांची भूमिका या विषयावर मोलाची माहिती सांगुन मार्गदर्शन केले.शेकडो मुलींना लाठीकाठी व शिवारतीच्या माध्यमातून घडवणारे *जीतू मोरे यांनी माहिला मुलींना धर्मशिक्षणाच्या व आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून मुलींवर कसे संस्कार करावे व मुलींनी स्वतःमधे कसा बदल करावा याची माहिती सांगितली.बाळासाहेबांची शिवसेना माहिला आघाडी उपशहर प्रमुख प्रज्ञाताई तांदळे यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्व सांगून आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगाता करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रमामध्ये महिला वं मुलींचा मोठया प्रमाणात सहभाग लाभला. उपस्थित सर्व मुलींनी व महिलांनी सावित्रीबाईचा वसा व वारसा पुढील पिढीला पोहचवण्याचे आश्वासन दिले._
यावेळी
सौ.भावना सोनटक्के, सचिव,
सौ.विजया गोरे -सहसचिव,
कु.स्वाती पारधी, कांचन बावस्कार,प्रमिला राखोंडे, उषा बावस्कार, यांच्यासह इतर शिवसैनिक महिला व शिवकन्या मुली उपस्थित होत्या.
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *