रामदास पंडित यांचे मरणोत्तर नेत्रदान

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
 मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
देऊळगाव राजा प्रतिनिधी 
शहरातील विश्वविजेता दैनिकाचे पत्रकार राजेश पंडित यांचे वडील रामदास पंडित यांचे दिनांक तीन जानेवारी 23 रोजी पहाटे तीन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू पश्चात त्यांचे मानोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांचा मुलगा राजेश पंडित व त्यांचे नातेवाईक नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष सुनील शेजुळकर यांनी घेतला व जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉक्टर अशोक काबरा व जायंट्स वेलफेअर फाउंडेशन चे डायरेकटर सन्मती जैन यांना माहिती देऊन नेत्रदान करून घेणे बाबत कळविले त्यानुसार जालना येथील गणपती नेत्रालयाच्या डॉक्टर राधिका दरक व त्यांच्या चमुने येऊन नेत्रदान प्रक्रिया पार पाडली नाभिक समाजाच्या 108 महिला व पुरुषांनी दिनांक 11-10-2016 रोजी सामूहिकरीत्या मनोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलेला होता त्या दिवशी नाभिक समाजाचे जेष्ठ नागरिक म्हणून रामदास पंडित यांनी सर्वप्रथम मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेला होता त्याची आठवण म्हणून त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केल्याने या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे रामदास पंडित यांचे पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी,तीन मुले ,सुना,नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *