दर्पणकार ..
बालकृष्ण जांभेकर
सार्थ पत्रकार खंदा
विसाव्यावर्षी पत्रक
पेलतो समर्थ खांदा
जनता नि राजकर्ता
होई दुवादोघा सांधा
घालून दिली संहिता
पत्रकारिता ना धंदा
चालवी अखंड व्रत
विना जाहिरात चंदा
दिग्दर्शनमासिक सुरु
नसता मुद्रण सुविधा
राज्यकर्त्यां विरोधात
उचलली बलिष्ठ गदा
लेखणी बने तलवार
रणांगण करे कागदा
आद्य युवाप्राध्यापक
मोह तरीही ना पदा
दहा भाषेत प्राविण्य
तल्लखलेखकउमदा
वाड्मय अन् विज्ञान
प्राप्त समृध्द संपदा
पाठ्य पुस्तक करता
सहन केल्या आपदा
चौतीसाव्या वर्षातचं
देवाघरी गेला योध्दा
नेताना अल्पायुष्यात
गहिवरला देव सुध्दा
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
Users Today : 0