बुलडाणा , राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणारे अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे. केंद्र शासनाने 1 जानेवारी 2023 पासुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात येणार असून, बुलढाणा जिल्हयामध्ये अन्न धान्य वितरणाचे पुढीलप्रमाणे प्राधान्य कुटुंबा योजना गहू- दोन किलो प्रति व्यक्ती, प्राधान्य कुटुंब योजना तांदूळ तीन किलो प्रती व्यक्ती, अंत्योदय योजना गहू 18 किलो प्रती कार्ड धारकांना,तांदूळ 17 किलो प्रती कार्ड धारकास, साखर 1 किलो प्रती कार्डधारकांना साखर 20 रुपये किलो. सर्व धान्य परिणाम गोदामातील उपलब्ध साठा व लाभार्थीं संख्येचे उपलब्धतेनुसार राहील असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
Users Today : 32