खामगांव तालुक्यातील मुलींकरीता आत्मसंरक्षण करिता स्वयंसिध्दाचे अनिवासी प्रशिक्षण शिबिर बाबत.

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा , महिला व मुलींकरीता आत्मरक्षण कला अवगत व्हावी व त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचे व कुटूंबाचे रक्षण करता यावे व आत्मविश्वासाने जीवन जगता यावे या उद्देशाने खामगांव येथील तसेच खामगांव तालुक्यातील मुली व महिलांकरीता दि.10 जानेवारी 2023 पासुन ते दि.25 जानेवारी 2023 पर्यंत, तालुका क्रीडा संकुल, खामगांव येथे महिला आत्मरक्षण कला प्रशिक्षण शिबीराचे निशुल्क आयोजन करण्यात आले आहे. खामगांव शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थीनी / महाविद्यालयीन विद्यार्थीनी तसेच महिलांचा सहभाग वाढविण्याकरीता आपल्या सहकार्याची आवश्यकता असुन, आपल्या शाळा / महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थींनीना सदर शिबीरामध्ये सहभागी होण्याकरीता प्रोत्साहीत करावे व शिबीरामध्ये सहभागी होण्यास इच्छुक विद्यार्थीनींची यादी शिबीर प्रमुख श्री.राजेश सोनले, तालुका क्रीडा संकुल, खामगांव (मो.नं.9881954211) येथे सादर करण्यात यावी. सदर शिबीर सकाळ व सायंकाळ दोन तास चालणार असुन,शिबीराला आत्मरक्षणाबाबतचे प्रशिक्षण श्री.राजेश सोनले, मानद क्रीडा मार्गदर्शक यांचेकडून निशुल्क देण्यात येणार आहे. तसेच शिबीरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या जिवित वा वित्तहानीची जबाबदारी ही सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींची राहील. समारोप समारंभामध्ये सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीला सहभाग प्रमाणपत्र देवुन सन्मानीत करण्यात येईल असे मा.ॲड.आकाश फुंडकर, मा.आमदार तथा अध्यक्ष, तालुका क्रीडा संकुल समिती, खामगांव, मा.श्री.अतुल पाटोळे तहसिलदार, मा.श्री. अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, मा.श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा, मा.श्री.लक्ष्मीशंकर यादव तालुका क्रीडा अधिकारी खामगांव, मा.श्री.नंदकिशोर खरात गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगांव यांनी आवाहन केले आहे.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *