बुलडाणा, दि. 29 : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रवेश परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. या प्रवेश परिक्षेसाठी दि. 10 जानेवारी, 2023 पर्यत अर्ज प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र आहेत.सर्व मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्याकडुन भरुन घेऊन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज शासकीय, अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत.आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, पालक, विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रासोबत जोडावा. सदर परीक्षा दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी सहावीकरिता सकाळी 11 ते 13 या वेळेत आणि सातवी ते नववी करिता सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. ही परिक्षा शासकीय आश्रमशाळा, कोथळी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला, शासकीय आश्रमशाळा, घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा येथे होणार आहे असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.
Users Today : 32