सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे जि.प.प्रार्थमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.स्त्री जीवनाचा हुंकार आणि स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जि.प.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आनंदा वारांगणे यांनी सावित्रीबाईना अभिवादन करण्यात आले. सावित्रीमाईंच्या जयंती दिनापासून सावित्रीबाई ते जिजाऊ उत्सव असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. आज पहिल्या दिवशी मोलखेडा गावापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमास सौ.मनिषाताई ज्ञानेश्वर वारांगणे,ग्रा.सदस्य अतुल इंगळे गावातील महिला उपस्थित होत्या. येथील महिलांनी निश्चय केला की आज पासून संपूर्ण महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा निर्णय झाला. यावेळी केंद्र प्रमुख श्रीमती एस.बी.राठोड,आनंदा वारांगणे मुख्याध्यापक, अवधूत सर,वाजुळगे सर, चौधरी सर, संदीप कळसकर व जि.प.शाळेचे शिक्षकवृंद,आदी महिला उपस्थित व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.