सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दिनांक 3 जानेवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती व शिक्षण महर्षी आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम एम.डी.सोनवणे मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले कशाप्रकारे क्रांतीज्योती यांचे शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः त्यांना शिक्षण देऊन पूर्ण केले व त्यानंतर संपूर्ण महिला शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती लादली पुणे येथील भिले वाड्यात सर्वप्रथम महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रचल्या गेली व पहिला महिला शिक्षिका व पहिली मराठी मुलींची शाळा निर्माण करणाऱ्या क्रांतीज्योती ह्या पहिल्या महिला शिक्षका होत्या त्याचे परिणाम आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा वाटा हा 50 टक्के नसून जवळपास 70 टक्के वर येऊन पोहोचलाय याचा अर्थ क्रांतीज्योती यांना वाहिलेले हे खरे अभिवादन होईल आज जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक व इतर कोणत्याही ठिकाणी महिला अग्रस्थानी आहे आपल्या भारतातील पहिली महिला राष्ट्रपती असो किंवा पहिली महिला पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो व IIAS व IPS अधिकारी या सर्वांच्या पाठीशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेच योगदान मानावे लागेल त्यांचे आज नाव सुवर्ण अक्षरांमध्ये कोरले जाते म्हणून पुणे येथील विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे नाव देण्यात आलेले आहे हे सुद्धा विसरता कामा नये तेव्हा आपणही तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगले शिक्षण घ्यावे आपल्या परिवाराचे व भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन मुख्याध्यापक एम.डी.सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले यावेळेस सौ.स्वातीताई भाऊराव पाटील सरपंच,मो.आरिफ मो.लुखमान उपसरपंच,शाळेय समितीचे अध्यक्ष सुपडा तडवी,शिक्षक भागवत गायकवाड, सतीश ढोणे,गवई सर,निता हिरास मॅडम शाळेतील सर्व शिक्षकबंधु इत्यादी उपस्थित होते याबद्दल सविस्तर माहिती प्रा.जीवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते)यांनी बोलताना दिली.