नांदुरा शहरातील ज्येष्ठ समाजसेविका सौ. सारिकाताई राजेश डागा ‘ सावित्रीकन्या ‘ पुरस्काराने सन्मानित

Khozmaster
2 Min Read

श्रीकांत हिवाळे नांदुरा प्रतिनिधी :-नवी दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती यांच्या वतीने देशातील कला, शिक्षण, साहित्य, समाजसेवा, खेळ आदी क्षेत्रात महत्वपूर्ण व भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी ‘सावित्रीकन्या’ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सदैव अग्रेसर असलेल्या नांदुरा शहरातील ज्येष्ठ समाजसेविका व सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदुरा शहर भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. सारिकाताई राजेश डागा यांना नवी दिल्ली येथे मंगळवार दि. ०३जानेवारी२०२३ रोजी केंद्रीय राज्यमंत्री-वित्तमंत्री मा. डॉ. श्री भागवतजी कराड यांच्या शुभहस्ते ‘सावित्रीकन्या ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊन त्यांच्या कार्यांचा गौरव करण्यात आला. सौ. सारिकाताई राजेश डागा यांनी समाजसेवा व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल व त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला._भारतीय महिलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच असून सामाजिक व महिलांच्या सर्वांगीण विकास कार्यात सर्वसामान्य जनतेने स्वयंस्फुर्तीने सहभागी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत सौ. सारिकाताई राजेश डागा यांनी यावेळी व्यक्त केले. लोकोपयोगी व सामाजिक कार्य करताना अनेकांचे सहकार्य तथा आशीर्वाद लाभत असतो. सदर पुरस्कार हा सामाजिक कार्यात सदैव प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे माझ्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना समर्पित करीत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.ज्येष्ठ समाजसेविका सौ. सारिकाताई डागा यांना याआधी बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून नोव्हेंबर २०२० मध्ये सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय एकात्मता नारिशक्ती पुरस्काराच्या सुद्धा त्या मानकरी ठरलेल्या आहेत हे विशेष.’सावित्रीकन्या’ पुरस्कार पटकविल्याबद्दल सौ. सारिकाताई राजेश डागा यांच्यावर शहरातील सर्व प्रशासकीय अधिकारी, उच्च पदस्थ, राजकीय पदाधिकारी तसेच समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *