आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त समर्थ कृषी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी काढली जनजागृती रॅली.

Khozmaster
1 Min Read

तालुका. प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारे आयोजित निवासी विशेष शिबिर दत्तक ग्राम खल्याळ गव्हाण येथे दि 2 ते 8 जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. या विशेष शिबिरा दरम्यान ग्रामस्थांमध्ये तृणधान्यचा पेरा वाढावा व आरोग्याच्या दृष्टीने जनसामान्यांमध्ये या तृणधान्याचा वापर वाढावा या दृष्टीने रासेयो स्वयंसेवकांनी गावामध्ये रॅलीचे आयोजन केले होते, या रॅली दरम्यान स्वयंसेवकांनी गावकऱ्यांना तृणधान्याचे महत्त्व समजावून सांगत तृणधान्यामुळे आपण आर्थिक दृष्ट्या संपन्न देखील होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच तृणधान्याचा वापर कशाप्रकारे आज रोजी वाढत आहे याबद्दल देखील सह प्रमाण सांगितले. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामस्थांमध्ये रॅली काढून व घोषणा देऊन जागृती केली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा शुभम काकड, सहकार्यक्रम अधिकारी प्रा लिकेश मेश्राम, प्रा विलास सातपुते, प्रा श्वेता धांडे व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *