मंत्री म्हणजे सरकार चालवणाऱ्या टिमचा सवंगडी. तो २८८ आमदारांमधे उत्तम असला पाहिजे.प्रामाणिक आणि अभ्यासू असला पाहिजे.ज्या आमदारांमधून तो निवडला जातो तो आमदार सुद्धा तीन चार लाखात एक पाहिजे. त्याला सामाजिक भान, राजकीय ज्ञान, परिस्थितीची जाण असली पाहिजे.पण येथे झाले उलटेच.जो दारू विकतो,तो आमदार.जो चोरी करतो ,तो आमदार.जो बायका बदलतो, मारतो तो आमदार.जो माणसांचा ,मताची खरेदी विक्री व्यापार करतो, तो आमदार.जो स्वताची पत सुद्धा विकतो तो आमदार.असा नालायक माणूस आमदार झाला आणि त्यातून आधिकतम नालायक आमदार मंत्री झाला,आणि त्यातून सर्वाधिक नालायक मंत्री मुख्यमंत्री झाला तर लोकशाहीचा,लोकांचा,देशाचा सत्यानाश अटळ आहे.
दादा भुसे नावाचा माणूस कोणते धंदे करून आमदार झाला,हे त्यांचे मतदार जाणतात,सांगतात.हे एकदा ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री होते.धरणगांव तालुक्यातील नारणे येथील सरपंचाने दहा शौचालयचा निधी हजम केला.पांच शौचालय बांधले.ते प्राथमिक शाळेजवळ बांधले म्हणून पाडलेत.पंचायत समीतीचे अभियंता व बीडीओची परवानगी न घेता.म्हणून जळगाव झेडपी सीईओ कडे तक्रार महाराष्ट्र जागृत जनमंच ने केली.चौकशीत सरपंच दोषी आढळला.अपात्र ची शिफारस केली.नाशीक विभागीय आयुक्तांनी सरपंच अपात्र केला.हा सरपंच ग्रामविकासमंत्री दादा भुसेकडे गेला.भुसेंनी काय प्रसाद घेतला तेच सांगतील,नार्को टेस्ट केल्यावर, पण सरपंचाला पात्र केला.याचा अर्थ असा घ्यायचा का आयईएस परीक्षा पास असलेल्या सीईओ व आयुक्त यांच्या पेक्षा भुसेंना कायद्याचे जास्त ज्ञान असेल का? आता लोकांनी आणि मतदारांनी विचार केला पाहिजे कि आपण निवडून दिलेला आमदार लायक आहे कि नालायक आहे ? जो शौचालय सुद्धा हजम करतो,ढेकर देतो.
आता अब्दुल सत्तार नावाचा माणूस सिल्लोड च्या लोकांनी निवडून दिला.या माणसाने सरकारी जमीन कोणा एकाला देऊन टाकावी का ? मंत्री झाला म्हणून जमीन काय मंत्री च्या बापाची झाली काय? फुकट दिली असेल का? जर मंत्री माणूस, ज्यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला,ठाकरेंनी मंत्री बनवतांना काय दिले घेतले ते सांगतीलच,नार्को टेस्ट केल्यावर.पण मंत्री हाच माणूस जमीन कोणालाही विकून कैश करीत असेल तर या जमीनीचे रक्षण सैनिकांनी बलिदान देऊन का करावे?बंदुकीची नळकांडी कुणीकडे वळवावी? अशा मंत्री ला मानधन,गाडी,बंगला,नोकर, पोलिस. फौजफाटा दिला आहे तो लोकांच्या करातूनच.लोकांच्या जीएसटी मधूनच.तर लोकांनी कर ,जीएसटी का भरावा?जर आमदार आणि मंत्री नालायक असतील तर?
धरणगांव चे आमदार गुलाबराव पाटील.ठाकरेंचे एकनिष्ठ.ठाकरेंची तुलना बापाशी करणारे.ते आता जळगाव जिल्हा पालकमंत्री आहेत.या आमदाराला ठाकरेंनी काहीच न घेता देता मंत्री बनवले असेल ते ठाकरेंची नार्को टेस्ट केल्यावर कळेलच.या मंत्री ने जळगाव जिल्ह्यातील कोरोना निधी काहीही औषधी व यंत्र सामग्री न घेता उडवला.जशी पहिल्या धारेची दारू बोटावर घेतल्यावर उडते तशीच.आणि जिल्ह्यातील २५९१माणसे औषधी व प्राणवायू वाचून तडफडत मेली हो! डीपीडीसी मधे आक्षेप घेतला.विधानसभा व विधानपरिषदेत आक्षेप घेतला.पोलिसात, कोर्टात आक्षेप घेतला.तरीही उद्धव ठाकरे मौन बाळगून आहेत.एकनाथ शिंदे मौन बाळगून आहेत.अजितदादा मौन बाळगून आहेत.नाना पटोले मौन बाळगून आहेत.फडणवीस मौन बाळगून आहेत.एकाच पंक्तीत जेवले असतील का? मृतांचे मांस कच्चे खाणारे आणि रक्ताचा रस्सा ओरपणारे हे मंत्री लायक कि नालायक?
यासाठी आम्ही लोक कर भरतो का? यासाठी व्यापारी जीएसटी भरतात का? गुलाबराव, ठाकरे,शिंदे यांचे घबाड भरण्यासाठी? याचा विचार आता लोकांनी केला पाहिजे,आमचा आमदार,आमचा मंत्री लायक आहे कि नालायक आहे?
एकनाथ शिंदे पन्नास आमदार घेऊन रातोरात गुवाहाटी पळाले.म्हणे मला आता मुख्यमंत्री व्हायचे आहे.मुख्यमंत्रीच्या कमरेला सरकारी तिजोरीची चाबी असते.ठाकरे देतात पण मोजून देतात.अ हं! आपल्याला खोऱ्याने पाहिजे.खुल जा सीमसीम !पुरा खजिना मेराच !! यासाठी भाजपने कोणता विधी केला ते मोदी ,शहा, फडणवीस सांगतीलच.नार्को टेस्ट केल्यावर.विधानसभेत आक्षेप घेतला गेला कि, याच शिंदेंनी नागपूर ला ८६ कोटीची जमीन फक्त २ कोटीला देऊन टाकली म्हणे,एका माणसाला.कोर्टाने मनाई केल्यावर सुद्धा.म्हणे मला याचे ज्ञान नाही.तर मग, कशाला बनले मुख्यमंत्री?ठाण्याला रीक्षा चालवा किंवा साताऱ्याला शेती करा.जर मुख्यमंत्री अशीच कोणालाही जमीन बेकायदेशीर देऊन टाकत असतील तर सैनिकांनी का रक्षण करावे या जमीनीचे,या देशाचे?बंदुकीची नळकांडी कुणीकडे वळवावी?
नरेंद्र मोदी तर खूप देशभक्तीच्या गोष्टी करतात.येथे देशभक्ती आठवत नाही का ?म्हणे,” मै फकीर हूं.झोला उठाकर चला जाऊंगा.”फकीर असे धंदे करतात का ? फकीर असे धंदे करू देतात का ?अशा लोकांना मुख्यमंत्री बनवतात का ?जे सरकारी जमीन कोणालाही विकून टाकतात.या अशा मंत्री साठी मानधन,गाडी,बंगला, नोकर, पोलिस फौजफाटा देण्यासाठी आम्ही सरकारला कर द्यायचा का?अशा मंत्री च्या पोषणासाठी आणि आमच्याच शोषणासाठी व्यापारीने जीएसटी भरायचा का ?हे तर तिजोरीला पाडलेले भोक आहे.हे तर जमीनीला पाडलेले भोक आहे. हे तर देशाला पडलेले भोक आहे.आमचे आमदार आणि मंत्री लायक आहेत कि नालायक आहेत,हे कोर्टाने नव्हे, आम्ही लोकांनी, मतदारांनी ठरवले पाहिजे.त्यालाच लोकशाही म्हणतात. लोकांनी विचार केलाच पाहिजे,लोकशाही हवी ?
….. शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.