पडते पाया बाबा नका मला मारू
दारू पिऊन तुम्ही असा धिंगाणा करू !! धृ . !!
मजुरीसाठी माय माझी शेतात जाते
लवकर उठून घरी सकला स्वयंपाक करते
तरी तुम्ही तिचा असा जीव नका घेऊ
मजुरांसवे बोंड बोंड उन्हात वेचते
थकुनभागून संध्याकाळी घराला येते
ढोसलून तुम्ही तिला शिव्या नका देवू
व्यसनी आहे बाप तुझा पोरी मला म्हणता
डोळ्यात काहून तुम्ही माझ्या आसवं आणता
बदला तुमची सवय बाबा द्याना मला शिकू
@ आनंदा वारांगणे.मोलखेडा ता सोयगाव.
Users Today : 0