मातृतीर्थ जिजाऊ जन्मस्थळावर चोखोबा ते तुकोबा समता वारी चे स्वागत व प्रबोधन

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा समता बंधुता मानवता ची शिकवण देत चोखोबा ते तुकोबा समता वारी संत चोखामेळा अध्यासन केंद्राकडून महाराष्ट्रभर भ्रमण करीत आहे समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन समता काय आहे यावर प्रबोधन चर्चा कीर्तन करत हा पालखी रथ सिंदखेड राजा जिजाऊ जन्मस्थळावर पोहोचला   याप्रसंगी वैष्णव गडाच्या पायथ्याशी असलेल्या उगला गावचे सरपंच अनिल अंकुश काकडे संत चोखोबा रायांच्या पालखीचे वंशज यांनी जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज ह भ प शिवाजी महाराज मोरे देहू यांचा सत्कार केला वडपिंपळांचा जन्म कावळ्याच्या विष्ठेत झाला तरी आपल्या कर्तव्याने ते पवित्र वृक्ष ठरतात त्याचप्रमाणे हे काकडे परिवारातील शेकडो लोक वैष्णव धर्माचे पालन करून आज पर्यंत शुद्ध सात्विक राहून पालखीचे पावित्र्य सांभाळतात त्यांचे सोबत मातृतीर्थावर गजानन घुले सुभाष मुंडे श्रीराम मुंडे अभिमन्यू उगले दिलीप काकडे संतोष ससाने बालाजी उगले माणिकराव जाधव अंकुशराव काकडे अनिल आम्रपाली काकडे पुनम सुनील काकडे यांनी समता वारी सोबत स्वामी स्वरूपानंद जी महाराज रमेश पांडव निलेश गद्रे सर ऋषिकेश सकनुर यांचे औक्षण केले सत्कार नंतर समता वारी चित्ररथासह संत चोखामेळा जन्मभूमी मेव्हणा राजाकडे प्रस्थान झाली

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *